उल्हासनगरात वाढीव विज बिला विरोधात मनसेचे आंदोलन .
- by Reporter
- Jul 30, 2020
- 708 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने उल्हासनगर ३ येथील महावितरण कार्यालयाच्या बाहेर वाढीव विज बिलाची होळी करुन सरकार व महावितरण चा जाहिर निषेध करण्यात आला.गेली चार महिने सरकारने सातत्याने लाक डाऊन जाहिर केल्यामुळे बहुसंख्य नागरिक घरीच बसून आहेत. हाताला काम नाही व खाजगी कंपनी तुन वेतन मिळत नाही.अशा वेळेला आपला व आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह कसा चालवायचा अशी चिंता सतावत आसतांना व नागरिकांना आधीच मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशातच महावितरण ने नागरिकांना पाच ते दहा पट वाढीव वीज बिल पाठवून नागरिकांच्या जखमेवर मिठ चोळले असल्याचा आरोप मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे . तर मनसे ने आपल्या निवेदना मध्ये चार महिन्याचे विज बिल माफ करन्यात यावे या मांगणी सह महावितरण समोर प्रामुख्याने ५ मागण्या ठेवल्या असुन त्या जर मान्य झाल्या नाहीत आणि नागरिकांना विज बिलात सुट मिळाली नाही तर मनसे यापुढे आपले आंदोलन अजून तीव्र करेल असा इशाराच मनसेच्या वतीने महावितरण च्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे . यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, शहर अध्यक्ष बंडू देशमुख , मनविसे शहर अध्यक्ष मनोज शेलार, कामगार नेते दिलीप थोरात, शहर उपाध्यक्ष सुभाष हटकर, सचिव प्रविण माळवे,मनविसे शहर संघटक अशोक गरड,वाहतुक सेनेचे काळू थोरात,विभाग अध्यक्ष अनिल गोधडे, सुहास बनसोडे, अक्षय धोत्रे ,प्रमोद पालकर,नागेश बारसकर,योगिराज देशमुख, बादशाहा शेख,तन्मेश देशमुख, सचिन चौधरी, रवी पाल, सुधिर सावंत,संजय नार्वेकर,यश पाटील,धनंजय कर्पे,अजय वानखेडे,करीम शेख, महिला सेनेच्या रेखा झा, यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर