
चोरटी वीज वापरणाऱ्या फॉर्म हाऊसवर कारवाई
- by Reporter
- Jul 29, 2020
- 1045 views
पालघर (प्रतिनिधी) : विजेचे मीटर न घेता वर्षभर चोरटी वीज वापरणाऱ्या खोडाला येथील फॉर्म हाऊस मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोखाडा तालुक्यातील खोडाला येथील राणीचा माळ येथे सदरचे फॉर्म हाऊस असून या ठिकाणी बांधण्यात रेस्ट हाऊसमध्ये गेल्या वर्षभर चोरटी वीज वापरली जात होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली असून वीज वितरणच्या कार्यकारी अभियंता यांनी मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सदर फॉर्म हाऊस मालकाने वर्षभरात ४ हजार ८६ युनिटची वीज चोरी केली असून ६३ हजार ८८० रुपयाचे वीज वितरणचे नुकसान झाल्याचे वीज वितरण कडून सांगण्यात आले. या प्रकरणी मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय विद्युत कायदा २००३ चे १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
रिपोर्टर