उल्हासनगर मधील यशवंत विद्यालयाचे घवघवीत यश ९९' ३१ टक्के लागला दहावीचा निकाल . मृदुला गमरे प्रथम .
- by Rameshwar Gawai
- Jul 29, 2020
- 604 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल यशवंत विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असुन १४६ विद्यार्थ्या पैकी १४५ विद्यार्थी चांगल्या गुणानी उत्तिर्ण झाले आहेत . तर मृदुला गमरे ही विद्यार्थीनी ९५ टक्के गुण घेवुन उत्तिर्ण झाली आहे तिच्या या यशाने यशवंत विद्यालयाचे नाव शहरात गाजत आहे .
नुकताच राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या एस एस सी बोर्डाने निकाल जाहीर केला आहे . या मध्ये उल्हासनगर कॅंप ४ येथे असलेल्या यशवंत विद्यालयाने छान बाजी मारत १४६ विद्यार्थ्या पैकी १४५ विद्यार्थी चांगल्या गुणानी उत्तिर्ण झाले असुन या विद्यालयाचा ९९' ३१ ऐवढ्या टक्क्यानी निकाल लागला आहेत . तर हे विद्यालय उल्हासनगरात प्रथम क्रमांकावर आहे तर याच विद्यालयाची विद्यार्थीनी मृदुला गमरे हिने ९५ टक्के गुण मिळवुन छान बाजी मारली असुन तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे .
दरम्यान उल्हासनगर कॅंप ३ येथिल संम्राट अशोक नगर मध्ये असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडर विद्यालयाचा सुध्दा ६३ टक्के निकाला लागला असुन ३९ पैकी ३९ विद्यार्थी दहावी उत्तिर्ण झाले असल्याची माहीती विद्यालयाचे सस्थापक व माजी नगरासेवक महादेव सोनावणे यानी दिली आहे . तर तक्षशिला विद्यालयाचा सुध्दा निकाल समाधान कारक लागला असुन मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम