उल्हासनगर शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांच्या बाहेर दरपत्रक लावा - मनसेची मागणी .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : आपल्या देशा सह संपूर्ण राज्य कोरोना  सारख्या महामारीचा सामना करीत आहे. परंतु काही खाजगी रुग्णालय मात्र या महामारीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या मजबुरीचा फायदा घेत रुग्णांना भरमसाठ बिल आकारुन रुग्णांच्या नातेवाईकांना वेठिस धरीत आहेत आणि ही बाब गंभीर आहे.तेव्हा या सर्व खाजगी रुग्णालयानी बाहेर दर पत्रक लावावे अशी मांगणी उल्हासनगर मनसेचे शहर अध्यक्ष बंडु देशमुख यानी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर याना निवेदनाद्वारे  केली आहे .

सध्या या कोरोनाच्या महामारीत मनसेने सर्व पक्षाना धोबी पछाड देत या काळात गोर गरीबाना ध्यान्य औषधे रुग्णालयीन मदत ही मोठ्या प्रमाणात केली आहे . तर येथिल आरोग्य यंत्रणेवर अंकुश ठेवन्याचे ही काम मनसेचे बंडु देशमुख . सचिन कदम . प्रदीप गोडसे यानी केलेले आहे . तर आता येथिल खाजगी रुग्णालये हे कोरोना च्या नावाने रुग्णाना भरमसाठ बिले देवुन लुटत आहेत . म्हणुन  शासनाच्या दिनांक  २१/०५ / २०२० रोजीच्या परिपत्रकात दिलेल्या नियमावली नुसार जर प्रत्येक खाजगी  रुग्णालयाच्या बाहेर दर्शनी भागात नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी दरपत्रक लावण्याची सक्ती आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात यावी.जेणे करुन शहरातील प्रत्येक नागरिकाला कळेल की शासनाने प्रत्येक रुग्णालयाला दरपत्रक ठरवून दिलेले  आहे.आणि त्या दरपत्रका नुसारच आपल्याला बिल अदा करायच आहे.व त्यामुळे जे खाजगी रुग्णालय भरमसाठ बिल आकारुन रुग्णांच्या नातेवाईकांना वेठिस धरतायेत त्यालाही आळा बसेल आशी मागणी मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर यांना ई मेल व्दारे निवेदन पाठवुन केली असुन तर महापालिका आयुक्त डॉ . राजा  दयानिधी यांना सुध्दा वरील मांगणीचे  निवेदन दिले आहे . दरम्यान निवेदनात त्यानी म्हटले आहे की 
 

उल्हासनगर शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांच्या बाहेर दर्शनी भागात दरपत्रक लावण्याचे आदेश दयावेत व ते दरपत्रक लावतांना महापालिकेच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर सुध्दा प्रत्येक .खाजगी रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात यावेत जेणे करुन जास्त बिल आकारल्यास संबंधित अधिकाऱ्याकडे नागरिकांना सहज तक्रार करता येईल अशी मागणी सुध्दा देशमुख यांनी केली आहे. यावेळी शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह विभाग अध्यक्ष अनिल गोधडे,सुहास बनसोडे हे ही उपस्थित होते.     


संबंधित पोस्ट