आशा सेविका यांना मानधन वाढवण्यास टाळा टाळ ! पालकमंत्र्याच्या आदेशाला केेेराची टोपली

उल्हासनगर/ प्रतिनिधी  : उल्हासनगरात कोविड काळात प्रत्यक्ष हॉट स्पॉट मध्ये काम करणाऱ्या आशा सेविका  यांना प्रतिमाह एक हजार मानधन मिळत होते.  स दर ची

बाब टीओके नगरसेविका सविता तोरणे आणि समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी  मनपा आयुक्त. व  महापौर लिलाबाई आशान.  उपमहापौर भगवान भालेराव आणि सभागृह नेते राजेंद्र चौधरी  यांच्या कडे  आशा सेविका यांना मानधन वाढवुन देण्यासाठी निवेदन दिले होते या शिवाय सदर प्रकरणी ठाण्याचे

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः  याची गंभीर दखल घेऊन आशा सेविकाचे मानधन वाढवुन देण्याची सूचना महापौर आणि मनपा आयुक्त समवेत संबधीत अधिकाऱ्यांना दिली होती पालकमंत्र्याची सूचना मिळताच

 मनपा ने १७ जुन २०२० रोजी लेखी आदेश काढून आशा सेविकांना प्रतिदिन ३००  रुपये प्रमाणे मानधन वाढविण्याचे लेखी आदेश दिले होते परंतु 

आदेश काढून एक महिना उलटून गेला तरी ही  अजून एकही रुपया आशा सेविकांना मिळालेला नाही असा आरोप शिवाजी रगडे यांना केली आहे .  

आज शिवाजी रगडे यांनी महापौर उपमहापौर यांच्या शी चर्चा करून मनपा ने काढलेल्या आदेशाची त्वरित अंबलबजावणी व्हावी अशी विनंती केली आहे. 

 श्री रगडे यांनी सांगितले की एका बाजूला करोडो रुपयांचे बिल पास केले जात आहेत व  दुसऱ्या बाजूला आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना त्यांचे मानधन मात्र आदेश काढूनही दिल जात नाही शिवाय पालकमंत्री यांच्याही आदेशाला जुमानत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे श्री रगडे यांनी सांगितले आहे . दरम्यान लवकरच या बाबत आशा सेविकांचे एक शिष्टमंडळ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून आपली व्यथा मांडणार आहेत .

संबंधित पोस्ट