उल्हासनगर महापालिकेचा कोरोना घोटाळा तीन महिन्यात जेवणावर अडीच कोटी खर्च
- by Rameshwar Gawai
- Jul 28, 2020
- 1042 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेने मानवतेचे दर्शन देत रुग्ण व डॉक्टर याना एकाच दर्जाचे जेवन देवुन तीन महिन्यात त्या जेवणार अडीच कोटी रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे . तर पाण्याच्या बाटल्यांवर एकंदरीत ५० लाख रुपये खर्च करुन शहरवासीयाना एक प्रकारे भ्रष्टाचारी मानवतेचे दर्शन घडवुन आणले आहे . तर या सर्व खर्चाला स्थायी समिती मध्ये असलेल्या सर्व सदस्यानी एक मुखाने मान्यता देवुन टाकली आहे .ऑन लाईन पध्दतीने सदर सभा झाली आहे त्यात या मंजुरीला दुजोरी मिळाला आहे .
उल्हासनगर शहरात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णाना चांगली सेवा देन्या करिता महापालिकेने कोविड रुग्णालये सुरु केली आहेत . या रुग्णालयात उपचारा करिता दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी याना एकाच दर्जाचे जेवण देन्यात येत आहे . तेव्हा या जेवनाच्या खर्चावर २३ मार्च ते १० जुलै पर्यंत तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च झाले असुन इतर खर्च ३२ लाख रुपये असा दाखवला आहे . ही माहिती स्थायी समितीचे सभापती राजेश वधारिया यानी दिली असुन तसा ठराव सुध्दा सर्व नगरसेवकानी मंजुर केला आहे दरम्यान हे जेवन देताना त्यात दुध . अंडी व फळे यांचा सामावेश केल्याचे सांगितले आहे . दरम्यान रुग्ण डॉक्टर कर्मचारी असा कोणता ही भेदभाव न करता सर्वाना एकाच दर्जाचे जेवण दिल्याची माहीती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त मनिष हिवरे यानी दिली आहे . तर एका रुग्णाच्या जेवणावर एका दिवसाला ३१८ रुपये खर्च आल्याचे ही त्यानी सांगितले आहे . मध्यंतरी पालकमंत्री व विरोधी पक्ष नेते यांच्या उल्हासनगर येथिल दौऱ्या नंतर १३जुन ते ११ जुलै या २८ दिवसाच्या कालावधीत तब्बल ८० लाख रुपये खर्च झाला असुन या सर्व खर्चाला सर्व पक्षीय स्थायी समितीतील सदस्यानी मंजुरी दिली आहे . त्याच अग्निशमन दला करीता सुध्दा ४५ लाखाचे साहित्य खरेदी केले असुन अग्निशमन दलाच्या जवानाच्या एका बुटावर १२ हजार रुपये खर्च केल्याचे दाखवन्यात आले आहे . तर काही औषध फवारणीचे साहित्य आणि ऑक्सिमिटर व फिवर थर्मल चे साहित्य यावर सुध्दा एक कोटी रुपये खर्च केले आहेत असे एकंदरीत अडीच कोटी रुपये या कोरोना च्या नावाने मानवतेच्या दृष्टीकोनातुन खर्च करुन शासनाच्या निधीची लयलुट सुरु केल्याचे हे जीवंत उदाहरण आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम