उल्हासनगरातील नागरिकांचे लाईट बिल माफ झाले पाहिजे . खा . डॉ शिंदेना साकडे .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर मध्ये कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने सर्व व्यवहार ठप्प झाले असुन गोर गरीब नागरिक घरीच बसले आहेत तेव्हा शासनाने यांचे वाढीव लाईट बिल अद्याप पर्यंत माफ केले नसुन कोण्याही  राजकारण्यानी सुध्दा या वाढीव बिला बाबत आवाज उठवला नाही . दरम्यान कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ . श्रीकांत शिंदे हे एक जागरुक खासदार असल्याने उल्हासनगर येथिल छत्रपती शाहु फुले आंबेडकरी सामाजिक सस्थाचे अध्यक्ष अनिल बागुल यानी खासदारांचे या विषया कडे लक्ष वेधले असुन सर्व गोर गरीब नागरिकांचे वाढीव विज बिल माफ करन्याची मांगणी त्यांच्या कडे केली आहे .
 
देशात राज्यात उल्हासनगरात कोरोना या महामारीच्या पादुर्भावाने  सर्व सामान्य नागरिक शासनाने लादलेल्या लॉकडाऊन मुळे घरीच बसला आहे कामधंदे बंद पडले आहेत . तर याच लॉक डाऊन च्या काळात  शासनाने  वाढीव लाईट बिला  कडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तेव्हा याच मतदार संघाचे खासदार डॉ . शिंदे हे असल्याने छत्रपती फुले शाहु आंबेडकरी सामाजिक सस्थेचे अध्यक्ष अनिल बागुल यानी खासदारानी या वाढीव लाईट बिला बाबत लक्ष घालुन गोर गरीबाना न्याय मिळवुन द्यावा अशी मांगणी केली आहे . आपल्या मतदार संघातच उल्हासनगर मध्येच ७० टक्के जनता रोजंदारी कामगार आहेत हाताला मिळेल ते काम करुन पोट भरत असतात.  इथे रिक्षा चालक,हाथ मजुर,धुनी भांडी करणारी लोक आहे हे गेल्या ५ महिन्या  पासुन घरीच आहेत त्यात महावितरण कंपनी ने रीडिंग न घेता आणि काही फॉल्टी मिटर मध्ये बदल न करता ३ ते ४ महिन्या चे अंदाजे बिल पाठवले आहे आपण नक्कीच  आपल्या  सर्व सामन्य लोकांची बाजू मांडून आम्हाला न्याय देणार ही अपेक्षा बागुल यानी व्यक्त केली आहे .

संबंधित पोस्ट