अंबरनाथ येथिल चिखलोली धरणाला धोका .
- by Rameshwar Gawai
- Jul 27, 2020
- 979 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शेजारी असलेल्या व अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाला धोका निर्माण झाला आहे . या पूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तावली डोंगराच्या शेजारी असलेल्या तीन डोंगरा पैकी मधल्या डोंगरावर गेल्या वर्षी वीज पडल्याने डोंगराचा काही भाग धरणाच्या जलमार्गामध्ये आला होता. वरील प्रकरण शासनाच्या निदर्शनास आणुन दिन्यात आले होते . परंतु आज पर्यंत शासनाने कोणतीच दखल घेतली नाही. सदर धरण, उगमस्थान असलेला ओढा आणि जलमार्गाची रुंदी व खोली करून त्याचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी नदी मित्र सर्व सहकारी मिळून गेल्या वर्षी उपोषण करन्यात आले होते . पण आज पर्यंत त्याची दखल घेतली गेली नाही. वरील डोंगर हा वीज पडून हादरला गेला असल्यामुळे आता झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील दगड माती आणि हजारो लाखो झाडे ही सदरच्या जलमार्गामध्ये आठ ते दहा किलो मीटर जांभिवलीच्या वाघोबा देवस्थानच्या डोंगरा समोर आदिवासींच्या शेताजवळ वाहून अडकले आहे. सदर दगड माती रेती झाडे जर धरणामध्ये आल्यास धरणाच्या भिंतीवर भार पडून धरण फुटण्याचा धोका संभवतो. तर धरण फुटून जिवीत व वित्तहानी होवून त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे येथिल जागरुक नागरिकांचे म्हणणे आहे . हे होण्याआधीच धरण आणि त्याचा जलमार्गावर असलेल्या बदलापूर ,अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, शहाड, आंबिवली, कल्याण, डोंबिवली या शहरातील नागरिकांचे रक्षण करून होणारा धोका टाळावा.अशी मांगणी वारसा हक्क चळवळीचे प्रमुख सुधाकर झोरे यानी केली असुन त्यानी
मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री , महसूल मंत्री, जलसंपदा मंत्री, खासदार , आमदार आणि सर्व राजकीय पक्षाचे शहर प्रमुख , समाजसेवक . सामाजिक संस्था व जिल्हाधिकारी ,लघु पाटबंधारे कार्यालय कळवा ठाणे व उपविभागीय अधिकारी मा. गिरासे साहेब याना निवेदने पाठविली आहेत . दरम्यान शासनाने या बाबत लवकरात लवकर लक्ष घालुन धरणाची दुरुस्ती करावी अशी ही मांगणी सुधाकर झोरे यानी केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम