मध्यवर्ती रुग्णालयात सुरू होणार व्हेन्टिलेटर सेवा,मनसेच्या पाठपुराव्याला अखेर यश.
- by Rameshwar Gawai
- Jul 26, 2020
- 1906 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठ पुराव्याला अखेर यश आले असून उल्हासनगर ३ मधिल मध्यवर्ती रुग्णालयात लवकरच ६ व्हेन्टिलेटर शहरातील रुग्णांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. अशी माहिती मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली.जवळपास १ वर्षापासून मध्यवर्ती रुग्णालयात अति दक्षता विभाग व व्हेन्टिलेटर उपलब्ध व्हावेत म्हणून मनसेच्या वतीने बंडू देशमुख सातत्याने पाठपुरावा करीत होते. जर व्हेन्टिलेटर सह इतर सुविधा तात्काळ उपलब्ध झाल्या नाहीत तर मनसेच्या वतीने २२ जुलैला आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने ४ जुलै ला निवेदनाव्दाॕरे उपसंचालक डाॕ. गौरी राठोड व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . सुधाकर शिंदे यांना देण्यात आला होता. त्या अनुषंगाने मध्यवर्ती रुग्णालयाल ६ व्हेन्टिलेटर उपलब्ध करुन देण्यात आले असून हे व्हेन्टिलेटर इस्टालेशन करण्याचे काम मध्यवर्ती रुग्णालयात सुरू झाले आहे. आणि ते लवकरच शहरातील गोर-गरीब रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच रुग्णांलयाच्या गेटवर प्रत्येक रुग्णाची थर्मल स्क्रिंनिग सुध्दा केली जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन सुध्दा बंडू देशमुख यांना रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. ६ व्हॅंटिलेटर तात्काळ उपलब्ध करुन दिल्यामुळे बंडू देशमुख यांनी मनसे च्या वती ने डाॕ. गौरी राठोड व डाॕ. सुधाकर शिंदे यांचे आभार मानले कारण या रुग्णालयात व्हेन्टिलेटर सेवा उपलब्ध नसल्यामुळे व बाहेर बेड मिळत नसल्यामुळे बऱ्या च नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत . त्यामुळे ६ व्हेन्टिलेटर मुळे थोडाफार दिलासा मिळणार असल्याची माहिती बंडू देशमुख यांनी दिली असुन इतर मुलभुत सुविधां साठी पाठपुरावा सुरुच ठेवणार असल्याचे ही देशमुख म्हणाले.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम