उल्हासनगर महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनसाठी विनामुल्य भूखंड मिळावा.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची मागणी.
- by Rameshwar Gawai
- Jul 24, 2020
- 531 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर मधील गायकवाड पाड्यातील अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे डम्पिंग ग्राऊंड तातडीने बंद करण्यात यावे तसेच उल्हासनगर महानगरपालिकेला घन कचरा व्यवस्थापनासाठी मौजे - उसाटने येथे असलेली जागा विनामूल्य उपलब्ध व्हावी, अशी लेखी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली आहे . तसेच त्यांनी यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्री. महेश पाठक यांची भेट घेत त्यांच्याकडे ही मागणी केली. मौजे - उसाटने येथील तीस एकर सलग जागा (स.नं.५०/१ व स.नं.६२) विनामूल्य महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. डम्पिंग ग्राउंडकरीता जमीन विनामूल्य मिळण्याकरिता राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात यावा असे ही त्यांनी लेखी निवेदनात नमूद केले आहे.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम