कोरोनावरील इंजेक्शनचा काळा बाजार करणारी महीला अटक .
- by Rameshwar Gawai
- Jul 24, 2020
- 474 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : कोरोना महामारी मुळे घाबरलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनःस्थितीचा फायदा घेत कोविडवरील इंजेक्शनचा काळा बाजार जोरात सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाने काल उल्हासनगरमध्ये अशाच प्रकरणात एका महिलेला इंजेक्सन चड्या भावाने विकन्याचा प्रयत्न केला म्हणुन अटक केली आहे. नीता पंजवानी असे त्या अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून ती सिपला कंपनीचे टोसीलीझुमॅब हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकत होती. सुमारे ४०,५४५ रुपयाचे हे इंजेक्शन ती ६० हजार रुपयांना विकत असता अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यानी तिला रंगेहाथ पकडले आहे .ही कारवाई सहआयुक्त विराज पौणिकर, सहाय्यक आयुक्त प्रवीण पवार, व्हिजिलन्सचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली निशिगंधा पष्टे, नितीन आहेर आणि संदीप नरावणे या औषध निरीक्षकांनी सापळा रचून ही केली आहे .
उल्हासनगर कॅंप ३ येथिल मनिष नगर मध्ये राहणारी निता प्रकाश पंजवानी ही महिला कोविड वरील ४०. ५४५रुपये किमंतीचे इंजेक्सन हे ६० हजार रुपये या चड्या भावाने विकत आहे अशी माहीती अन्न व औषध प्रशासन ठाणे याना मिळाली तेव्हा सह आयुक्त विराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक सौ . निशिगंधा किरण पष्टे . नितीन आहेर . व संदीप नरावणे यानी सापळा लावुन ती इंजेक्सन विकत असताना तिला रंगेहाथ पकडले आहे . निशिगंधा पष्टे यांच्या तक्रारीवरुन निता पंजवाणी यांच्या विरुध्द मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या चौकशीतून मोठ्या रॅकेटची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट घोंगावू लागताच मास्क आणि सॅनिटायझरची नफेखोरी सुरू झाली होती. ती रोखण्यात यश येत असतानाच कोरोना रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा मोठा काळाबाजार उघडकीस आला. या इंजेक्शनसाठी गरजूंची प्रचंड आर्थिक लूट करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकताच पर्दाफाश केला होता. या प्रकरणी सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली होती व त्यांच्याकडून काळ्या बाजारात विक्रीसाठी साठा करून ठेवलेली १२ रेमडेसिवीर इंजेक्शन हस्तगत करण्यात आली. ५,४०० रुपये किमतीचे इंजेक्शन ही टोळी ३० हजार रुपयांना विकत होती. पोलीस व एफडीएच्या धडक कारवाईनंतरही औषधांचा काळाबाजार सुरूच आहे, हे उल्हासनगरमधील महिलेच्या अटकेवरून पुन्हा एकदा उघड झाले असुन या महिलेच्या मागे कर्ता करवता कोण आहे हे तपासात निष्पन होणार आहे . तर या गुंह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आय व्ही कोकरे हे करत आहेत .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम