आदिवासींच्या जमीनी बळकवणाऱ्या सोबत तहसीलदाराचे साटेलोटे . विशालकुमार गुप्ता .
- by Rameshwar Gawai
- Jul 23, 2020
- 325 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर लगत असलेल्या वरप कांबा येथील आदीवासींच्या जमीनी बोगस शेतकरी असल्याचे कागद पत्रे तयार करुन काही भुमाफियानी हडप केल्या आहेत . या बाबत परिहीत चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी राष्ट्रिय अनुसूचित जाती जमाती आयोगा सह जिल्हाधिकारी यांच्या कडे केल्या आहेत . परंतु तहसिलदार व जमीनी हडप करणाऱ्यांचे साटे लोटे असल्याने या बाबत जमीनी बळकवणाऱ्यावर कोणती ही कारवाई होत नाही असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी केला आहे .
वरप कांबा येथिल आदिवासी यांच्या जमीनी बोगस कागद पत्राच्या आधारे केल्या असुन या बाबत अनेक तक्रारी करन्यात आल्या आहेत . तर कल्याण तहसीलदार दिपक आकडे याना पुन्हा निवेदन देवुन आदिवासी यांच्या जमीनी हडप करणाऱ्यावर कारवाई करन्याची मांगणी विशालकुमार गुप्ता यानी केली आहे त्यानी निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रिय अनुसूचित जाती जमाती यांच्या आदेशाचे उल्लघन करुन आणि अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यानी दिलेल्या स्थगिती आदेश दिलेला असताना सुध्दा त्यांच्या आदेशाचे उल्लघन होत असल्याचा आरोप करुन गुप्ता यानी म्हटले आहे की बोगस कागद पत्राच्या आधारे जमीनी बळकावणाऱ्या विरुध्द तहसीलदार यानी आपल्या स्तरावर कोणती ही कारवाई केली नाही . उलट त्या व्यक्तीना मदत करत असल्याचा आरोप गुप्ता यानी केला आहे . तर परिहीत चॅरिटेबल सोसायटी मार्फत आता पर्यंत ज्या ही तक्रारी केल्या आहेत . त्या तक्रारीचे निवारण आपल्या पदाचा वापर न करता उलट वरीष्ठ कार्यालया कडे मार्गदर्शन पर आदेश प्राप्ती करिता पाठविल्याचे जाणीव पुर्वक सांगन्यात येते . ही कृती आपल्या तहसिलदार पदाला शोभणारी नसुन तहसीलदार हा त्या तालुक्याचा सर्वे सर्वा असतो त्याला शासनाने त्यांच्या पातळीवर निर्णय घेन्याचे अधिकार दिले आहेत अस ही गुप्ता यानी निवेदनात म्हटले आहे . दरम्यान हे तहसिलदार आदिवासी यांच्या जमीनी त्याना परत मिळु नयेत असेच कृत्य करित आहेत . तर आदिवासींच्या जमीनी बळकवणाऱ्यांवर कोणती ही कारवाई न करता उलट हे प्रकरण प्रलंबित ठेवन्याच्या उद्देशानेच वरिष्ठ कार्यालयात पाठविल्याचे तहसिलदार सांगत आहेत . दरम्यान बोगस कागद पत्राच्या आधारे आदिवासीच्या जमीनी हडप करणाऱ्या सोबत तहसिलदार दिपक आकडे यांचे साटे लोटे असल्या कारणानेच हे प्रकरण जाणीव पुर्वक प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप विशालकुमार गुप्ता यानी केला आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम