उल्हासनगरातील कोरोना ग्रस्तांचे समुपदेशन करण्यासाठी येणार बेंगलोरची योसेड संस्था .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल कोरोना ग्रस्तांचे समुपदेशन करन्या करिता बेंगलोर येथिल प्रसिध्द योसेड नावाच्या संस्थेला पाचारण केले असुन ही सस्था महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यांच्या आदेशा नुसार आपापल्या निवासस्थानी होम क्वारंटाईन केलेल्या कोरोना रुग्णांचे बळ मनोधैर्य व मानसिकता सक्षम करन्याच्या उद्देशाने दुरध्वनी वरुन समुपदेशन करणार असल्याची माहीती जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यानी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे .

उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयात बेड्स ची संख्या कमी आहे .म्हणुन  त्या  अनुषंगाने कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाना होम क्वारंटाईन 
करण्यात येत आहे तेव्हा अशा रुग्णामध्ये जनजागृती करुन त्याच्या प्रकृतीची विचारपुस करन्यासाठी बेंगलोर येथिल योसेड ही सस्था विनामुल्य कार्य करणार आहे . त्याच प्रमाणे अत्यावश्यक असलेल्या रुग्णाना मदत करणार आहेत . कोरोना ग्रस्तांचे बळ मनोधैर्य व मानसिकता सक्षम करन्याचा या मागे उद्देश आहे . दरम्यान या योसेड सस्थेने या पुर्वी भिवंडीत चांगले काम केले असुन तो अनुभव त्या सस्थेला आहे . तर तेथे त्याना चांगले यश सुध्दा आले होते . म्हणुन या सस्थेचे दुरध्वनी समुपदेशक पथक तयार करन्यात आले असुन हे पथक होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांशी सतत दुरध्वनी द्वारे संपर्क साधणार आहेत . तर अत्यावश्यक असलेल्या ना विनामुल्य मदत करणार आहेत . महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शना खाली कोरोना रुग्णाना  संसर्गजन्य आजारातुन तात्काळ बरे होन्या करिता ही योजना लाभदायक ठरणार आहे . असा विश्वास जन संपर्क अधिकारी युवराज भदाणे यानी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात व्यक्त केला आहे . तर सदर माहीती ही कोरोना ने बाधित असलेले व सौम्य लक्षणे असलेल्याना होम क्वारंटाईन करन्यात आलेल्याना देन्यात यावी असे आव्हान आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी केले आहे . 

संबंधित पोस्ट