उल्हासनगर येथिल कोविड प्लॅटिनम हॉस्पिटल चा कारनामा . मृत रूग्णाच्या ताब्यातील ३० हजार रुपये गेले चोरीला .
- by Rameshwar Gawai
- Jul 21, 2020
- 555 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : रायते गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक राजू अनंत पवार, हे उल्हासनगर येथील कोविड प्लॅटिनम या हाॅस्पिटलमधे उपचारा करिता दाखल झाले होते. कोरोना रूग्णासोबत नातेवाईकांना राहता येत नसल्याने त्यांच्या भावाने तातडीच्या औषध खरेदीसाठी त्याना तीस हजार रूपये दिले होते.परंतु त्यांचे सदर रूग्णालयात उपचार घेत असताना काल रात्री निधन झाले.मात्र मृतदेह ताब्यात देताना त्याच्या कडील तीस हजाराची चोरी झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी संबंधितांकडे तक्रार केली असता,
त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहे . तर या प्रकरणी त्यांचा भाऊ मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास गेला असता,त्याची रितसर चोरीची फिर्याद न घेता,फक्त लेखी अर्ज देण्यास सांगण्यात आले आहे . कोरोना रूग्णांच्या पैश्यांची चोरी होणे माणूसकीला काळीमा फासणारी घटना असून पोलीसांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या चोरीचा छडा लावून मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी केली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम