उल्हासनगरात कोविड रुग्णांच्या मदतीला २६ अंब्युलंस .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहराची परिस्थिती बघता दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतांना दिसत आहे. शहरातील नागरिकांनी आरोग्य विभागाला लक्ष करीत अनेकांनी टीका केल्याचे दिसुन आले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यास अपयशी ठरलेल्या दोन आयुक्तांच्या बदल्याही करण्यात आल्या होत्या मात्र कोरोनाचे संक्रमण थांबण्याचे नावच घेतांना दिसत नाही. दरम्यान शासनाने  उल्हासनगर महानगरपालिकेला नविन आयएएस दर्जाचे आयुक्त डा राजा दयानिधी दिले  आहेत.त्यांनी शहराची पाहणी करुन  व्हिडीओ कान्फरसव्दारे लोकप्रतिनिधी चर्चा करुन संवाद साधला.  त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सुचना ऐकुन घेतल्या तसेच रुग्णासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये .कोरोना पेशंटच्या तत्पर सेवेसाठी २६ बसेस व रुग्णवाहिका तयार ठेवल्या आहेत. आता रूग्णांना नेआणकरण्यासाठी रूग्णवाहिकेसाठी ताटकळत बसावे लागणार नाही.  नवीन आयुक्तांनी हे कोरोना नियंत्रणासाठी उचललेले पहिले अभिनंदनीय पाऊल आहे.असे मत ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी व्यक्त केले आहे . तसेच आता एखादा रूग्ण एखाद्या इमारतीत सापडला तर संपूर्ण इमारत व त्यातील दुकानं सील न करता, तो मजला किंवा एकापेक्षा अधिक रूग्ण आढळल्यास सदर इमारतीचे प्रवेशद्वारच सील केले जाईल. त्यामुळे सदर इमारतीतील दुकानदारांना विनाकारण होणारा त्रास व व्यावसायिक नुकसान टळणार आहे. त्याच प्रमाणे अधिकाधिक बेड उपलब्ध होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कोविड रूग्णालय व कोविड केअर सेंटरची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने होत आहे.त्यामुळे आता प्रशासनास कोरोनावरील मात करण्यात निश्चितच यश लाभेल,अशी खात्री शहरवासियांना वाटू लागली आहे.

संबंधित पोस्ट