उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयाला कोविड हास्पिटल बनविण्यास मनसेचा विरोध.

उल्हासनगर (प्रतिनिधी) : राज्य शासनाचे उल्हासनगर - ३ मधिल मध्यवर्ती रुग्णालय कोविड रुग्णायल कराव यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशिल आहे.आणि ही बाब खुप गंभीर आहे. कारण उल्हासनगर शहर व आजूबाजूच्या परिसरात हे एकमेव रुग्णालय असे  आहे की ज्या ठिकाणी गोर-गरिब रुग्णांना प्राथमिक उपचारासह ईतर उपचार मिळू शकतात. आणि जर हे रुग्णालय  कोविड केल तर उल्हासनगर शहरातील सामान्य नागरिकांसह शहाराच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना उपचार मिळणे अवघड होईल. व नागरिकांवर घरातच मरण्याची वेळ येईल अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे चे उल्हासनगर शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली आहे . आणि आपल्याला जर अस व्हायला नको असेल तर हे रुग्णालय कोविड साठी देण्यात येऊ नये अशी विनंतीही डाँ. गौरी राठोड उपसंचालक आरोग्य विभाग ठाणे व डा. सुधाकर शिंदे जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदना व्दारे केली आहे.

आपल्या राज्यासह संपूर्ण देशात जवळपास ४ महीन्या पासुन  लाकडाऊन आहे. सामान्य माणूस व गोर-गरिबाच्या हाताला काम नाही पगार नाही सर्वांची आर्थिक घडी विस्कटली  आहे. अशा परिस्थितीत गोर गरीब  नागरिकांना खाजगी डाक्टर कडे जाणे  सुध्दा परवडत नाही. अशा वेळेला फक्त आणि फक्त हे एकच रुग्णालय असे  आहे की तिथे गोर-गरिबा वर उपचार होऊ शकतात.

म्हणून कुठल्याही परिस्थितीत मध्यवर्ती रुग्णालय कोविडसाठी देण्यात येऊ नये. कारण शासनाचे उल्हासनगर - ४ मधिल प्रसुतीगृह  हे या पुर्वीच  कोविड करण्यात आलेले  आहे.आणि त्यामुळे उल्हासनगर शहर व आजूबाजूच्या परिसरातील महिलांना प्रसुती साठी  आता हया एकाच रुग्णालयाचा आधार आहे. कारण खाजगी रुग्णालयात प्रसुती करिता  जो खर्च आहे तो खुप जास्त असतो.आणि तो सामान्य माणसाला परवडण्या सारखा नाही.

तसेच या रुग्णालयात प्रसुतीगृह , डायलेसिस सेंटर, रक्तपेढी, लहान मुलांसाठीच शिशूगृह, एक्स रे, सोनोग्राफी, आक्सिजन बेड, तसेच गोरगरिबांसाठी  छोटया मोठ्या शस्त्रक्रिया  सुविधा या रुग्णालयात  मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध आहेत. आणि यामुळे उल्हासनगर शहरासह  आजूबाजूच्या परिसरातील लाखो लोक या रुग्णालयावर अवलंबून आहेत याचही भान आम्हांला ठेवायला हव असेही बंडू देशमुख यांनी सांगितले आहे . 

कुठल्याही परिस्थिती मध्यवर्ती रुग्णालय कोविड रुग्णालय करण्यात येऊ नये अन्यथा शहरातील गोर-गरिब नागरिकांच्या न्याय हक्कासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलन कराव लागेल असा ही इशारा बंडु  देशमुख यांनी दिला आहे .







संबंधित पोस्ट