जेवणाच्या वादातुन पत्नीची हत्या . पतीला केली अटक .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर येथिल गायकवाड पाड्यात एका सनकी पतीने आपल्या  पत्निने जेवण चांगले बनवले नाही म्हणुन रागाच्या भरात त्याने पत्निच्या डोक्यात पाटा घालुन तिची हत्या केल्याने त्या पतिला शिवाजी नगर पोलिसानी अटक केली आहे . 

उल्हासनगर कॅंप ५ येथिल गायकवाड पाडा येथे सचिन गोंडाने हा आपली पत्नि चंद्रकला व दोन मुला सह  राहत होता . त्या दोघा पती पत्नित जेवणावरुन नेहमीच भांडणे होत होती . तेव्हा काल रात्री या दोघात जेवणा वरुन भांडण झाले . तेव्हा सचिन याने रागाच्या भरात पत्नि चंद्रकला हिस खिडकीच्या गजाला बांधुन त्याने तिच्या डोक्यात वरुन पाटा मारला . त्यामुळे तिचा जागीच मृत्यु झाला . दरम्यान शिवाजी नगर पोलिसानी घटनास्थळी जावुन तिच्या मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदना करिता मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे . तर पती सचिन गोंडाने याला  ३०२ या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे .

संबंधित पोस्ट