उल्हासनगरातील कोविड प्लॅटिनम हॉस्पिटल हे खाजगी आहे . अरुण आशान .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात कोविड रुग्णा करिता उभारण्यात आलेल्या प्लॅटिनम हॉस्पिटल बाबत जोरदार चर्चा सुरु असुन हे हॉस्पिटल खाजगी की महापालिकेचे आहे यावर दररोज टिका होत होती  परंतु प्लॅटिनम हॉस्पिटल हे महापालिकेचे नसुन खाजगी आहे असा खुलासा महापौर लिलाबाई आशाण यांचे चिरंजीव व  नगरसेवक अरुण आशाण यानी काल पत्रकार परिषदेत केला आहे .

उल्हासनगर शहरात कोरोना महामारी रोखन्या करिता कोविड रुग्णालयांची गरज असल्याने शांतीनगर येथिल रिजंसी प्लॉझा या इमारती मध्ये प्लॅटिनम नावाचे कोविड रुग्णालय सुरु केले असुन या रुग्णालयाचे उध्दाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे खा . डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करन्यात आले होते . तर सुरवातील हे हॉस्पिटल महापालिकेचे आहे असे भासवुन रुग्णाना मोफत उपचार मिळणार असा संदेश शहरवासीयाना देन्यात आला होता . दरम्यान प्लॅटिनम हॉस्पिटल प्रशासनाने कोविड रुग्णाना लाखो रुपये बिले देन्यास सुरवात केली तेव्हा या हॉस्पिटल विरोधात नागरिक आवाज उठवायला लागले तर सत्ताधाऱ्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता . तेव्हा काल महापौर लिलाबाई आशाण व आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी पत्रकार परिषद घेतली . त्या पत्रकार परिषदेत नगरसेवक अरुण आशाण यानी कोविड प्लॅटिनम हॉस्पिटल बाबत धक्कादायक खुलासा केला आहे . त्यानी पत्रकाराना माहिती देताना सांगितले आहे की प्लॅटिनम हॉस्पिटल हे खाजगी हॉस्पिटल आहे . महापालिकेने त्या हॉस्पिटल करिता जागा उपलब्ध करुन दिली आहे . तर त्या हॉस्पिटल करिता महापालिकेने दिलेले १८ लाख रुपये हॉस्पिटल चे संचालक डॉ . पॉल यानी महापालिकेला परत केले आहेत . मात्र या रुग्णालयात कोविड रुग्णाना महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजने अंतर्गत उपचार मिळणार असल्याचे ही आशाण यानी सांगितले आहे तर शहरात सध्या कोरोना रुग्णांचा वाढता आकडा बघता शहरातील टाऊन हॉल ताब्यात घेवुन तेथे १६० बेड चे सुसज्ज कोविड हॉस्पिटल तयार करन्याचे काम सुरु केल्याची माहीती आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी पत्रकार परिषदेत दिली आहे . दरम्यान महापालिकेने ५५० स्वयंसेवक याना सेवा देन्या करिता तयार केले असुन हे स्वयंसेवक धारावी पॅटर्न प्रमाणे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत तर शहरातील खाजगी रुग्णालयाना सुध्दा कोविड रुग्णा करिता बेड तयार करन्याचे आदेश दिले असल्याची ही माहीती आयुक्तानी दिली आहे . दरम्यान प्लॅटिनम हॉस्पिटल बाबत जी चर्चा सुरु होती त्या चर्चेवर मात्र पडदा पडला आहे . शहरातील नागरिकाना वेळेवर  उपचार मिळावे म्हणुन महापालिका प्रयत्नशील आहे . तर कोणी आजार लपवु नका पुढे येवुन इलाज करा . बाहेर फिरु नका घरातच रहा असे आव्हान आयुक्त डॉ दयानिधी यानी केले आहे .



संबंधित पोस्ट