कोविड सेंटरमध्ये मच्छरदाणी व गरम पाणी देण्याची मागणी

पालघर (प्रतिनिधी) : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या कालावधीत मच्छरांची पैदास मोठ्या  प्रमाणात होत असल्याने कोविड सेंटरमध्ये ठेवलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व कोरंनटाईन ठेवलेल्या व्यक्ती यांच्यासाठी मच्छरदाणी पुरविण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच पावसाळ्यात निर्माण झालेल्या गारव्यामुळे पिण्यासाठी व आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर व कोरंनटाईन सेंटरमध्ये मोबाइलला रेंज नसल्याने व काही रुग्णांकडे मोबाईलच नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांशी संपर्क होण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये संपर्काची व्यवस्थाही करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
            
पालघर जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील पॉझिटिव्ह रुग्ण व कोरंनटाईन सेंटरमधील व्यक्ती यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले असून याबाबत तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.
          
दरम्यान रुग्णांच्या मच्छरदाणी, गरम पाणी व संपर्क याबाबत प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट