
उल्हासनगरात मेट्रोपोलिस लॅब चा सावळा गोंधळ . एकाच महिलेचा दोन दिवसात पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपोर्ट .
- by Rameshwar Gawai
- Jul 15, 2020
- 962 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात मेट्रो पोलिस या खाजगी लॅब ने कोरोनाच्या चाचण्या करणे सुरु केले आहे . ह्या चाचण्यांचा रिपोर्ट दोन दिवसातच मिळत आहे . दरम्यान या लॅब मध्ये एक २२ वर्षिय महिलेने ११ जुलैला कोरोना चाचणी केली असता तिचा कोरोना चाचणी रिपोर्ट १२ जुलैला पॉझिटिव्ह आला . दरम्यान त्या महिलेला लॅब वर काही संशय आल्या मुळे त्या महिलेने पुन्हा १३ जुलैला मेट्रो पोलिस लॅब मध्ये जावुन आपली कोरोना चाचणी पुन्हा केली असता १४ जुलैला त्या महिलेचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला . या दोन दिवसातच पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने या लॅब चा काय सावळा गोंधळ सुरु आहे हेच समजुन येत नाही तर या लॅब वर शासनाने कारवाई करावी अशी मांगणी शाखा प्रमुख नासीर खान यानी केली आहे . तर हे लॅब वाले कोरोनाच्या नावाने लुटायला बसले आहेत असा ही आरोप त्यानी केला आहे .
उल्हासनगर कॅंप न . ३ येथिल शांतीनगर जवळ असलेल्या बाबा नगर मध्ये एक २२ वर्षीय महिलाआपल्या परिवारासह राहत आहे . तिने ११ जुलै रोजी गोल मैदान येथे असलेल्या मेट्रो पोलिस लॅब मध्ये जावुन कोरोना चाचणी केली . तर त्या चाचणीचा रिपोर्ट १२ जुलै ला पॉझिटिव्ह आला . दरम्यान त्या महिलेला काही लक्षणे नसताना कोरोनाचा चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला . या बाबत तिला लॅब च्या रिपोर्ट वर संशय निर्माण झाला . तेव्हा त्या महिलेने पुन्हा १३ जुलै रोजी त्याच लॅब मध्ये कोरोना चाचणी केली . तर त्या चाचणीचा रिपोर्ट १४ जुलै रोजी निगेटिव्ह आला . म्हणजेच दोन दिवसातच कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आल्याने ती महिला सुध्दा गांगरुन गेली आहे . दरम्यान मेट्रो पोलिस लॅब चा हा काय प्रकार आहे हेच समजुन येत नसुन या लॅब वर शासनाने बंदी आणुन कारवाई केली पाहिजे अशी मांगणी शिवसेना शाखा प्रमुख नासिर खान यानी केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम