उल्हासनगरात गोर गरिब नागरिक . व्यापारी कामगार आणि रिक्षा चालक यांच्या वर आली पुन्हा उपासमारीची वेळ .

उल्हासनगर  (प्रतिनिधी) :  उल्हासनगरात लाकडाऊन शिथिल केल्याने नागरिक कामासाठी  रोज जात असताना शहरात मात्र पुन्हा लाकडाऊन वाढवला आहे . याबाबत  दुकानदार उद्योजकांसह रोजदारीवर पोट असणाऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे उल्हासनगर महापालिकेने   दि. १२ जुलै . ते. दि. २२. जुलै . पर्यत पुन्हा लाकडाऊन वाढवला आहे .  या दरम्यान कोरोना चाचण्या अधिक वाढवल्याने आकडे  मोठ्या प्रमाणात  समोर येत आहेत . मात्र  लाकडाऊन करु न ही रुग्ण मात्र वाढत असतील तर लॉक डाऊन चा उपयोग काय असा प्रश्न रिक्षा चालक विचारत आहेत . तर  दुसरीकडे लाकडाऊनमुळे रोजनदारीवर उपजीविका आणि उद्योजकही आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडले असून गोर गरिब रिक्षाचालकांवर सुध्दा उपासमारीचे मोठे संकट आले आहे रिक्षावाल्यांची उपजीविकेचे साधन  म्हणजे रिक्षा आहे . रिक्षावाले अत्यंत गरीब असून त्यांच्यावरच  मुलांचे शिक्षण आणि कुंटूब चालत आहे . महाराष्ट्र सरकार  आणि  पंतप्रधान  नरेंद्र मोदी  म्हणतात की घरी रहा सुरक्षित रहा आणि घरी राहून काय उपाशी मरा  अशी वेळ  रिक्षा चालकांवर आली आहे.  काही  रिक्षा  तर कर्जावर काढण्यात आले आहे . तर त्यांचे हप्ते  कसे फेडावे हा मानसिक तणाव सतत रिक्षाचालकामध्ये निर्माण झाला  आहे.  रिक्षाचालकांना  व मालकांना किमान मासिक रक्कम देण्यात यावी तसेच सर्व रिक्षावाले सध्या घरी बसले आहे त्यांना मात्र उत्पन्नाचा मार्ग नाही कृपया रिक्षा तरी  चालू करा अशी मांगणी रिक्षा चालकांची आहे . तर  सदर उल्हासनगरात वारंवार वीज जात असल्यामुळे काही नागरिकांना वेळेवर पाणी सुध्दा मिळत नाही आणि सध्या गोर गरिब नागरिकांना कोरोनाच्या काळात भरमसाट  वीज बिले पाठविले आहेत त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे तसेच नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी (१००) युनिट  पर्यत वीज बिल हे माफ करण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितिन राऊत    यांनी केली होती.  त्यांचे काय झाले उलट   १. एप्रिल २०२० रोजी वीजदरवाढ करुन जनतेची दिशाभूल केली आहे . या लाकडाऊनचा राजकारणी नेते प्रशासन अधिकारी  बिल्डर . आमदार . खासदार . नगरसेवक . आणि मोठे व्यापारी आदीना फरक पडत नाही पण रोज मेहनत करुन पोट भरणा-या लहानसहान नोकरी व्यवसाय करणाऱ्या  सर्व सामान्यावर उपाशी मरण्याची वेळ आली आहे  या लाकडाऊनने नेमके काय साधले उलट या दहा दिवसात  (१८००) रुग्णाची वाढ झाली आहे . आता पुन्हा  २२ जुलै पर्यत  लाकडाऊन वाढवला आहे सतत लाकडाऊनमुळे नागरिक आणि रिक्षा चालकाचे मात्र कंबरडे मोडले असून उल्हासनगर शहरात दारुचे दुकाने यांना मात्र सुट आहे . उल्हासनगरात दारुचे दुकाने हे चालू आहेत आणि रिक्षा . किराणा दुकाने व नागरिकांचे काम बंद केले हा भेद भाव गोर गरीबांशी का करता असा सवाल नागरिक करत आहेत  . मा. पंतप्रधान  . आमदार  .  खासदार  . आणि प्रशासन अधिकारी  आपण जेवलात  पोट भरुन आपले कुंटूंब सुध्दा पोट भरुन जेवतात . मात्र गोर गरीबांचा  कोण विचार करणार . दरम्यान शासनाने रिक्षा चालकांचा तरी विचार करुन त्याना काही तरी आर्थिक मदत केली पाहिजे . अशी मांगणी रिक्षा चालक करत आहेत .

संबंधित पोस्ट