उल्हासनगरात तथाकथित संपादकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल,पोलिसानी केली अटक .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर मधील वादग्रस्त संपादक भरत तोलानी याने शहरात आतंक केला असुन त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात खंडणी पोक्सो  विनयभंग या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.  तो ऐवढा निर्ढावलेला असुन दिवसा ढवळ्या मुलींचे विनयभंग करन्याचे प्रकार करत आहे . काल अशाच एका मुलीचा त्याने विनयभंग केल्या प्रकरणी त्याला मध्यवर्ती पोलिसानी अटक केली आहे .

उल्हासनगर येथिल सी ब्लॉक येथे राहणारा भरत तोलानी हा एका साप्ताहिकाचा संपादक असुन त्याचे रंगिला नावाचे किराणा दुकान सुध्दा आहे परंतु हा त्या साप्ताहिकाच्या जोरावर ऐवढा उतमात करायला लागला आहे की तो भिवंडी,कल्याण,  पुणे , पिपंरी या ठिकाणी खंडणी वसुल करायला जात होता. तर त्याला या पुर्वी  भिवंडी येथे त्याला खंडणी मांगताना अटक सुध्दा झाली होती तर उल्हासनगर पोलिसानी विनयभंगाच्या गुन्ह्यात सुध्दा अटक केली होती. दरम्यान काल हाच भरत तोलानी दुपार च्या सुमारास आपल्या कार ने काजल पेट्रोल पंपाजवळुन जात असताना त्याच्या कार चा धक्का रिक्षाला लागला त्या रिक्षात एक मुलगी बसली होती. तर तोलानी हा उलट रिक्षावाल्या दमदाटी करत असताना रिक्षात बसलेल्या त्या मुलीने रिक्षावाल्याची बाजु घेवुन तोलानी सोबत बोलत असताना त्यांने तिच्या छातीला हात लावुन अश्लिल भाषेत शिविगाळ केली. तेव्हा त्या मुलीने भरत तोलानी यांच्या विरुध्द मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन पोलिसानी त्यांच्या विरुध्द कलम ३५४ , ५०४ नुसार गुन्हा दाखल केला असुन त्या भरत तोलानीला अटक केली आहे . तर त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असुन या गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे. 

संबंधित पोस्ट