उल्हासनगर शहरात २३ जुलै पर्यंत असणार लॉकडाऊन .
- by Rameshwar Gawai
- Jul 12, 2020
- 648 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात कोरोना या महामारीला रोखन्यासाठी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यानी २ जुलै पासुन ते १२ जुलै पर्यंत लॉक डाऊन सुरु केला होता परंतु आता पुन्हा १२ जुलै पासुन ते २३ जुलै पर्यंत लॉक डाऊन वाढविल्याचे आयुक्तानी जाहीर केले आहे . या लॉकडाऊन कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत .
उल्हासनगर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी शहरात २ जुलै पासुन ते १२ जुलै पर्यंत लॉक डाऊन सुरु केला आहे . तर हाच लॉक डाऊन पुन्हा २३ जुलै पर्यंत वाढवला आहे . शहरात नागरिक विनाकारण घरा बाहेर पडुन कोरोना विषाणु वाढवन्याचे काम करत आहेत . तर उल्हासनगर शहरात दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे . त्यामुळे रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत दरम्यान या कोरोनाची साखळी तोडन्या करिता आयुक्त डॉ दयानिधी हे प्रयत्न करत आहेत . तर रुग्णाना चांगले उपचार मिळावे म्हणुन कोविड रुग्णालये तयार करन्याचे प्रयत्न आयुक्त करत आहेत दरम्यान शहरात लॉक डाऊन वाढवला तरी रुग्णांची संख्या कमी होन्याचे नाव घेत नाही . त्यातच रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर सुध्दा पॉझिटिव्ह येत असल्याने याचा ताण इतर डॉक्टरांवर पडत आहे . तरी पण महापालिका आयुक्त डॉ . दयानिधी हे खुप प्रयत्न करत आहेत . दरम्यान महापालिकेने सस्पेक्टेड रुग्णा करिता एक १०० बेड चे रुग्णालय तयार केले पाहिजे . जेणे करुन त्या रुग्णांवर लवकर उपचार होतील . दरम्यान कोरोनाची लागण होताच रुग्णांचा ऑक्सिजन लेवल लगेच कमी होतो . त्यामुळे त्या रुग्णाला लवकर उपचार मिळाले नाही तर तो रुग्ण दगावतो . म्हणुन सर्व सोयी नी युक्त असे एक सस्पेक्टेड रुग्णा करिता हॉस्पिटल महापालिकेने तयार केले पाहिजे अशी मांगणी नागरिकांची आहे . तर या लॉक डाऊन काळात नागरिकानी घरा बाहेर पडु नये अस आव्हान आयुक्त डॉ . दयानिधी यानी केले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम