अनुकंपाखाली नोकरी दिली नाही म्हणुन तरुणाने S.B.I. ची हुबेहूब शाखाच उघडली....

चेन्नई :तामिळनाडूमध्ये स्टेट बँकेची खोटी शाखा उघडल्याचा धक्कादायाक प्रकार उघड झाला आहे. महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन मध्ये ही बँक उघडण्यात आली होती. स्टेट बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या मुलानेच हा प्रताप केला होता. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

स्टेट बँकेचे खरे अधिकारी ही ब्रांच पाहून आश्चर्यचकित झाले. कारण खऱ्या शाखे सारखी अगदी हुबेहूब ब्रांच बनविण्यात आली होती. एस.बी.आय.च्या माजी कर्मचाऱ्याचा मुलगा कमल बाबू याने हा प्रताप केला आहे. त्याने पनरुत्ती बाजार ब्रांचच्या नावे एक बनावट वेबसाईटही बनविली होती. पोलिसांनी कमलसोबत ए कुमार (42) आणि एम मणिकम यांनाही अटक केली आहे. 

या बोगस ब्रांचची पोलखोल तेव्हा झाली जेव्हा एसबीआयच्या  एका ग्राहकाने या ब्रांचबाबत त्या शहरातील दुसऱ्या एका ब्रांचमध्ये चौकशी केली. या ग्राहकाने या बनावट ब्रांचमध्ये मिळालेली पावती त्या बँकेत दाखविली. ही पावती पाहून मॅनेजरला धक्काच बसला. म्हणून त्यांनीच या बनावट ब्रांचला भेट दिली. आतमध्ये पाहताच त्यांनाही धक्का बसला. कारण तेथील सेटअप एस.बी.आय.सारखाच होता. आता पोलिसांनी या तिघां विरोधात आय पी सी कलम 473, 469, 484 आणि 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

कमलचे वडील हे बँकेत कर्मचारी होते. यामुळे कमलचे बँकेत नेहमी येणे जाणे असायचे. यामुळे त्याला बँकेच्या काम काजाची पुरेपूर माहिती होती. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आई देखील निवृत्त झाली. वडिलांच्या निधनानंतर त्याने स्टेट बँकेत अनुकंपाखाली नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र, त्याला नोकरी मिळण्यास खूप उशिर झाल्याने त्याने आपलीच एक शाखा उघडली. कमलवर अद्याप फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्याने त्याची आई आणि काकीच्या खात्यांवरून स्टेट बँकेचा खऱ्या खातेदारांना पैसे पाठविले आहेत. याचा तपास आता पोलीस करत आहेत

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट