उल्हासनगरात सस्पेक्टेड रुग्णा करिता हॉस्पिटल तयार करा . नागरिकांची मांगणी .

उल्हासनगर  (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहराच्या प्रादुर्भावाने येथिल नागरिक हतबल झाले आहेत . शहरात असलेले कोविड रुग्णालये वाढत्या रुग्ण संख्ये मुळे पुर्णता भरलेले आहेत . तर ज्याना श्वास घ्यायला त्रास होतो . ज्यांचा  ऑक्सिजन कमी झाला अशा सस्पेक्टेड रुग्णा करिता महापालिकेने स्वतंत्र हॉस्पिटल तयार केल पाहिजे अशी मांगणी येथिल नागरिक करत आहेत . कारण अशा रुग्णाना शहरातील रुग्णालये आपल्या प्रवेश द्वारावर ही थांबु देत नाहीत . त्यामुळे एक १०० बेड चे रुग्णालय असणे गरजेचे आहे . तर अशा या हॉस्पिटल मुळे त्या रुग्णाना जीवदान मिळु शकते .

उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी एक आदेश काढुन शहरातील खाजगी रुग्णालयानी कोविड रुग्णा करिता बेड तयार करुन त्या रुग्णावर उपचार करणे बंधनकारक आहे असे म्हटले आहे . परंतु येथिल खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन ऐवढे मुजोर झाले आहे की ते आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात . म्हणुन महापालिकेने या खाजगी रुग्णालयांवर अवलंबुन न राहता सस्पेक्टेड रुग्णा करिता स्वताचे रुग्णालय तयार करुन या रुग्णांचा जीव वाचवला पाहिजे . सध्य स्थितीत श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे बरेच रुग्ण दिवसे दिवस मिळत आहेत . मात्र त्याना वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यामुळे ते दगावत आहेत .दरम्यान अशोका फाऊंडेशन चे अध्यक्ष व शहरातील सर्व कोविड रुग्णालयातील डॉक्टर त्याना नावा निशी ओळखतात ते समाजसेवक शिवाजी रगडे यानी हीच मांगणी उचलुन धरली होती आणि सस्पेक्टेड रुग्णा करिता पर्यायी व्यवस्था केली नाही तर आंदोलन करन्याचा इशारा दिला होता . तेव्हा महापालिका आयुक्तानी या बाबत योग्य प्रकारे विचार होईल अस सांगितले होते . परंतु त्यावर कोणताच विचार झाला नसल्याचे दिसुन येते . तर फक्त खाजगी रुग्णालयाना आदेश देवुन कोविड रुग्णा करिता बेड तयार करन्याचे आदेश आयुक्तानी काढले आहेत . मात्र आता अमलबजावणी होते किंवा नाही हे ही बघायला मिळणार आहे . तर महापालिकेने सस्पेक्टेड रुग्णा करिता वेगळे हॉस्पिटल तयार करन्याच्या ही मांगणीचा विचार महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी केला पाहिजे .

संबंधित पोस्ट