उल्हासनगरचे माजी आमदार सितलदास हरचंदानी यांचे निधन .

उल्हासनगर (प्रतिनिधी) :  उल्हासनगर येथिल भाजपाचे माजी आमदार सितलदास हरचंदानी (८८) यांचे दुखद निधन झाले असुन ते दोन वेळ आमदार म्हणुन निवडुन आले होते तर त्यानी नवजीवन बॅंकेची स्थापना केली असुन शैक्षणिक क्षेत्र व आरोग्य क्षेत्रात ते ही पुढे होते . त्यांच्या या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे

उल्हासनगर ची स्थापना करन्या मागे ज्यांचे योगदान आहे असे ते शितलदास हरचंदानी हे आर एस एस मध्ये काम करत असताना ते जनता पार्टी च्या तिकीटावर १९८० मध्ये उल्हासनगर चे आमदार म्हणुन निवडुन आले होते . तर पुन्हा १९८५ ला सुध्दा आमदार म्हणुन निवडुन आले होते . त्यानी आपल्या या आमदार की च्या काळात मध्यवर्ती रुग्णालय शहराला दिले आहे . तर उल्हासनगर रेल्वे स्टेशन ही त्यांचीच देण असुन त्यानी नवजीवन बॅंक . मुक बधिरा करिता के सी स्कुल नावाची शाळा ही स्थापन केली आहे . इंग्रजी माध्यमाची शाळा  जसलोक हायस्कुल सुध्दा त्यानी स्थापन केली .तर आरोग्य क्षेत्रात उरताना त्यानी एक रुग्णालय ही स्थापन केल असुन या रुग्णालयात विविध आजारावर उपचार होत होते  तर त्यानी शहरातील एक हार्ट चा रुग्ण मुंबई येथिल रुग्णालयात जावु नये म्हणुन  एक भव्य असे हार्ट चे रुग्णालय तयार केले असुन त्या रुग्णालयाचे जवळपास ७५ टक्के काम पुर्ण झाले आहे . मात्र काही निधी अभावी त्या रुग्णालयाचे काम अपुर्ण राहिले आहे . दरम्यान शितलदास हरचंदानी हे १९९० साली आमदार की च्या निवडणुकीत हारल्या नंतर त्यानी मग आपल्या शाळा व बॅंक आरोग्य क्षेत्र या कडेच अधिक लक्ष दिले आहे . दरम्यान ते काही दिवसा पासुन आजारी होते त्याना नेरुळ येथिल एका खाजगी रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले होते परंतु काल त्यांचे अखेर निधन झाले

संबंधित पोस्ट