उल्हासनगरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने कोविड रुग्णालये बनविन्या करिता खाजगी मालमत्ता ताब्यात घेन्याचे जिल्हाधिकारी आंचे आयुक्ताना आदेश

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात कोरोनाचा कहर दिवसे दिवस वाढत चालला असुन रुग्णाना उपचारा करिता दाखल करुन घेन्या  करिता रुग्णालये कमी पडत आहेत . त्याच अनुंषगाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यानी उल्हासनगर येथिल खाजगी मालमत्ता ताब्यात घेन्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी याना दिला आहे . तर हे मालमत्ता व्यवस्थापक सदर मालमत्ता देन्यास नकार देत असतील तर त्या मालमत्ता व्यवस्थापकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या नुसार गुन्हे दाखल करन्याचे आदेशात जिल्हाधिकारी यानी नमुद केले आहे . दरम्यान शहरातील जे ही खाजगी रुग्णालये आहेत त्यानी आपापल्या रुग्णालयात कोविड रुग्णांकरिता बेड तयार करुन त्यांच्या वर उपचार करन्याचे ही आदेश आयुक्त डॉ . दयानिधी यानी दिले आहेत .

उल्हासनगर मध्ये आज पर्यंत ३०८८ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . तर त्याना शहरातील विविध रुग्णालयात उपचारा करिता दाखल करन्यात आले आहे . तर यातील अर्धे अधिक रुग्ण बरे देखिल झाले आहेत . परंतु कोरोना चा वाढता संसर्ग बघुन शहरात कोविड रुग्णालये कमी पडु नये म्हणुन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यानी एक आदेश काढला आहे .  उल्हासनगर शहरात असलेले सी एच एम कॉलेज . आर के टी कॉलेज . राधास्वामी संस्तंग . व न्य ईरा हायस्कुल ह्या चार खाजगी मालमत्ता ताब्यात घेन्याचे  आदेश काढले असुन या खाजगी मालमत्तेत कोविड रुग्णालये तयार करन्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी याना दिले आहेत . तर जर हे मालमत्ता व्यवस्थापक यानी सदर मालमत्ता देन्यास नकार दिला तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्या नुसार गुन्हा दाखल करन्याचे आदेशात जिल्हाधिकारी नार्वेकर यानी म्हटले आहे . दरम्यान उल्हासनगर येथिल कोरोना ग्रस्त रुग्णाना ताबडतोब उपचार मिळावेत म्हणुन येथिल खाजगी रुग्णालये याना आदेश देवुन आपापल्या रुग्णालयात कोविड रुग्णा करिता बेड तयार करुन त्या रुग्णाना उपचार देन्यात यावे असा आदेश डॉ दयानिधी यानी दिला असुन जे ही रुग्णालये कोरोना ग्रस्त रुग्णाना उपचारा करिता दाखल करुन घेणार नाहीत त्या रुग्णालयाची नोंदणी रद्द करन्यात येणार आहे अस ही आदेशात म्हटले आहे .

संबंधित पोस्ट