स्वॅब उल्हासनगरला घ्यायचे, झोपायला टाटा आमंत्राला पाठवायचे .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात कोरोना बाधितांचा आकडा २९६९ वर गेला असुन क्वारंटाईन केलेल्या संशयितांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत . स्वॅब उल्हासनगर मध्ये घेन्यात येतात व झोपायला क्वारंटाईन सेंटर असलेल्या टाटा आमंत्रा पाठवतात . मात्र तेथे दयनिय अवस्था असुन कोणती ही सुविधा सध्या तेथे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी टाटा आमंत्रावरुन येत आहेत . तर ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत त्याना तेथुन दोन दोन दिवस हलवत नसल्याच्या ही तक्रारी येत असुन महापालिका प्रशासन करते काय हा प्रश्न सध्या सर्वाना भेडसावत आहे .

उल्हासनगर शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे . दररोज पॉझिटिव्ह कोरोना अहवाल येत आहेत . एखाद्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याच्या परिवाराचे स्वॅब घेवुन त्याना भिवंडी बायपास येते असलेल्या टाटा आमंत्रा मध्ये क्वारंटाईन करन्यात येते . परंतु त्या टाटा आमंत्रा मध्ये सध्या तरी अनेक सुविधांचा अभाव असल्याने क्वारंटाईन केलेल्या नागरिकाना त्यांचा सामना करावा लागत आहे . त्याना झोपायला गाद्या मिळत नसल्याची ही तक्रार असुन पाणी सुध्दा मिळत नाही . दरम्यान आंघोळ देखिल  थंड्या  पाण्यानेच करावी लागत असल्याची ही तक्रार आहे . दरम्यान ज्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेत . त्याना त्यांच्या खोलीतुन दोन दोन दिवस रुग्णालयात नेत नसल्याची ही तक्रार आहे . तर टाटा आमंत्रा येथे काम करत असलेल्या महापालिकेच्या  एका कर्मचाऱ्याने नाव न छापन्याच्या अटीवर सांगितले आहे की टाटा आमंत्रा येथे सध्या भयानक स्थिती आहे . साबन नाही . सॅनिटायझर उपलब्ध करुन देत नाहीत . गाद्यांचा ही मोठा प्राब्लेम झाला असुन क्वारंटाईन करिता आणलेल्या नागरिकाना त्यांचे स्वताचे चादर अंथरुन झोपावे लागते . अशी सध्याची अवस्था आहे . फक्त स्वॅब उल्हासनगर मध्ये घ्यायचे व झोपायला टाटा आमंत्राला पाठवायचे अशी अवस्था सध्याची आहे . दरम्यान उल्हासनगर महापालिकेने या सर्व बाबी कडे लक्ष दिले पाहिजे . सध्या नागरिक भयभित झाले आहेत . खाजगी रुग्णालये उपचार करत नाहीत . तर कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे सांगन्यात येते मग शहरातील नागरिकानी करायचे काय असा प्रश्न येथिल नागरिकाना पडला आहे . दरम्यान आयुक्त डॉ राजा दयानिधी यानी अजुन तरी कोणती उपाय योजना अमलात आणल्याचे दिसुन येत नाही .
 

संबंधित पोस्ट