
राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्हासनगर दौरा .
- by Rameshwar Gawai
- Jul 05, 2020
- 1050 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर मध्ये कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात आहे.यामुळे शहराची परिस्थिती बिकट होतांना दिसत आहे.महापालिकेची आरोग्य व्यवस्था तोकडी आहे.त्यामुळे राज्य सरकारच्या आरोग्य विभागावर अवलंबून रहावे लागत आहे.येथे टेस्टिंग लॅब नाही त्यामुळे रिपोर्ट यायला ३ ते ४ दिवस लागतात. यामुळे रुग्णांनी काय करायचं असा प्रश्न उपस्थित होतो.तेव्हा वेळेवर त्यांचा रिपोर्ट येणं गरजेचं आहे.तर ज्याना लक्षणे आहेत मात्र त्यांचा कोरोना रिपोर्ट आला नाही त्यानी जायच कुठ असा प्रश्न उपस्थित होत आहे . यामुळे रिपोर्ट २४तासात येणे गरजेचं आहे. तर महापालिकेची आरोग्य यंत्रणा ही तोकडी आहे . त्याना शासनाच्या आरोग्य यंत्रणेवर आणि येथिल खाजगी आरोग्य यंत्रणेवर अवलंबुन राहावे लागते . तर चाचणी रिपोर्ट हे लवकर आले पाहिजेत . असे आयुक्त डॉ राजा दयानिधी याना देवेंद्र फडणवीस यानी सुचना दिल्या आहेत .महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.अशा अनेक विषयांवर आयुक्तांशी चर्चा केल्याचे फडणवीस यानी सांगितले आहे.मात्र विरोधी पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडवला असल्याचे ही दिसुन आले आहे . शहरात लॉकडाऊन असताना ऐवढा मोठा ताफा की त्या मध्ये जवळपास दोनशे भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम