आदिवासीच्या जमिनी वरील स्टे असताना सुध्दा अनधिकृत बांधकाम सुरूच.

उल्हासनगर  / प्रतिनिधी : उल्हासनगर लगत असलेल्या  वरप कांबा गावात आदिवासी जमिनी वर अनुसुचित जाती जमाती आयोगाच्या आदेशाहून ठाणे जिल्हा जिल्हाधिकारी यांनी बांधकामा करिता स्थगिती दिली असताना देखील बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे.काही शिक्षण सम्राट हे खोटा शेतकरी दाखला बनवून शेतकऱ्यां कडून जमीन खरेदी केल्याचे दाखवून हे बांधकाम करीत आहेत.या बाबत परीहीत चॅरिटेबल सोसायटी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही गोष्ट उघड केली आहे. पत्रकार परिषदेत  परिहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशाल कुमार गुप्ता यांनी या बाबत माहिती दिली आहे . 

या प्रकरणा बाबत विशाल कुमार गुप्ता यांनी माहिती देताना सांगितले की,वरप कांबा गावा तील आदिवासींची जमीन कोचीन क्लासेस चालवणारे संचालक लाल नोतनदास तनवाणी, नरेश रोशनलाल भाटिया,प्रकाश रेवाचंद्र बुधराणी, यश रावलानी व अन्य उद्योगपती यांनी राजकारण्यांना हाताशी धरून खोटे शेतकरी असल्याचे खोटे जमीन दाखले देऊन खरेदी करून हडपली आहे. पण या बाबत राजस्थानच्या सीरोही जिल्ह्यात च्या जिल्हाधिकाऱ्यांनी लिखित माहिती दिलेली आहे की, जमीन दाखले हे शेतकरी दाखले होऊ शकत नाहीत. या बाबत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे देखील या बाबत डोळे झाक करीत असुन या शिक्षण सम्राटाना  मदत करीत असल्याचा आरोपही या बाबत विशाल कुमार गुप्तां यांनी पत्रकार परिषदेत केला आहे .

या प्रकरणाची माहिती देताना विशाल कुमार गुप्ता यांनी पुढे सांगितले की, आदिवासींच्या जामिनी काही धनदांडग्यानी शेतकरी असल्याचे खोटे दाखले जोडून जमीनी हडप करण्याच्या प्रकारात तसेच ॲट्रोसिटी बाबत राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग दिल्ली येथे सुनावणी सुरू आहे.या प्रकरणात दिल्ली येथे आयोगा समोर हजर राहण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व ठाणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ शिवाजी राठोड    यांना  दोन   वेळा.   दिले   होते.
२६ फेब्रुवारीला आदिवासींची जमीन हडपण्याच्या या प्रकरणात या दोघांना आयोगा समोर पुराव्यानिशी उपस्थित राहण्याचे सक्त आदेश दिले  होते.परंतु या प्रकरणात जिल्हाधिकारी नार्वेकर व पोलीस अधीक्षक राठोड यांनी आपले प्रतिनिधी कल्याणचे प्रांत अधिकारी डॉ नितीन महाजन व मुरबाडचे उपविभागीय उपअधीक्षक डॉ बसवराज शिवपूरे यांना पाठविले होते. या बाबत आयोगाने हजर राहिलेल्या अधिकाऱ्यांची हजेरी नामंजूर ठरवत आपणास कोणी बोलावले आहे असा प्रतिप्रश्न आयोगाने त्या वेळी  उपस्थित केला होता. 

पुढील तारखेस आयोगा पुढे हजर न  राहिल्यास या दोघांवर वाँरट काढण्यात येईल अशी सक्त ताकीद ही  त्या वेळी देण्यात आली होती. दरम्यान कोरोना मुळे लॉक डाऊन सुरू झाल्याने या प्रकरणीची सुनावणी थंडावली होती अशी माहिती देखील परीहि त चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशाल  कुमार गुप्तां यांनी या पत्रकार परिषदेत दिली आपला न्याय व्यवस्थे वर विश्वास  असून  आदिवासी जमीन हडपण्याच्या प्रकरणात यातील शिक्षण सम्राट आरोपी हे एक दिवस जेलची हवा जरूर खातील असा विश्वास ही या वेळी विशालकुमार यांनी व्यक्त केला आहे .या बाबत संबंधितांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित पोस्ट