जुलैमध्ये होणा-या NEET, व JEE Main 2020 परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलल्या

नवी दिल्ली :   NEET व JEE Main परीक्षांना पुन्हा एकदा कोरोना संकटाचा फटका बसला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, देशातील परिस्थितीत अजूनही सुधारणा होत नसल्यानं त्याचबरोबर वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमी परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं घेतला आहे.

ऐन परीक्षांच्या काळात करोनानं देशात शिरकाव केला. त्यामुळे शालेय परीक्षांपासून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. करोनामुळे यंदा जेईई व नीट या दोन्ही परीक्षाही लांबल्या आहेत. मे महिन्या मध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता.त्यासंदर्भातील वेळापत्रकही निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, अजूनही परिस्थिती चिंताजनक असल्यानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्री पोखरियाल यांनी याची घोषणा केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेईईची मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येईल. तर जेईई अॅडव्हॉन्स परीक्षा २७ सप्टेंबर आणि नीट परीक्षा ३१ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल," अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट