
उल्हासनगर शहर आज पासुन पुन्हा १२ जुलै पर्यंत लॉकडाऊन .
- by Rameshwar Gawai
- Jul 02, 2020
- 680 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी उल्हासनगर महापालिकेचे नव नियुक्त आयुक्त डॉ राजा दयानिधी यानी आज पासुन ते १२ जुलै पर्यंत शहर लॉकडाऊन करन्याचा आदेश काढला असुन या आदेशाची अमलबजावणी २ जुलै च्या ५ वाजल्या पासुन सुरु होणार आहे . तेव्हा या लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद राहणार आहे तर पोलिसानी सुध्दा जागो जागी बंदोबस्त लावला असुन कंटेन्मेन्ट झोन असलेल्या परिसरात लॉकडाऊन कडक असणार आहे .
उल्हासनगर शहरात अन लॉक मध्ये नागरिक सैरभैर झाले होते . रस्त्यावर नागरिकानी फिजिकल डिस्टंसिंगचे ही भान राखले नसुन जागो जागी गर्दीच गर्दी दिसुन येत होती त्यामुळे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढतच आहे . तर शहरात पुन्हा लॉकडाऊन करा असे पत्र मनसेचे शहर अध्यक्ष बंडु देशमुख . कॉंग्रेस चे सचिव रोहित साळवे यानी आयुक्ताना पत्र देवुन तशी मांगणी केली होती . दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे आजुबाजुची शहरे या पुर्वीच लॉकडाऊन झाली आहेत त्यातच शहरात कोरोना बाधितांचा आकडा देखिल १९०० से च्या पार गेला आहे . त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी उल्हासनगर शहराचा आढावा घेत शहर पुन्हा लॉकाडाऊन करन्याचा योग्य निर्णय घेतला . तेव्हा आज पासुन (२ जुलै पासुन ) सायंकाळी ५ वाजल्या पासुन ते १२ जुलै पर्यंत उल्हासनगर शहर बंद राहणार आहे . या बंद मध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहे . दरम्यान कोरोनाची साखळी तोडन्याचा संकल्प आयुक्त डॉ . दयानिधी यानी केला आहे . तर या लॉकडाऊन मध्ये पोलिसांची कसोटी लागणार असुन नागरिकानी घरा बाहेर पडु नये अस आव्हान सुध्दा आयुक्त डॉ . दयानिधी यानी केले आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम