
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा व समृद्धी फाउंडेशनच्या वतीने कोरोना योध्याना सन्मान चिन्ह व रेशन किटचे वाटप .
- by Rameshwar Gawai
- Jul 01, 2020
- 963 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर येथिल मनसेच्या वतीने या कोरोना महामारीच्या काळात आपल्या कुटुंबाची परवा न करता दिवस रात्र मेहनत घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्य अधिकारी . परिचारिका आशा वर्कर यांचा सन्मान करुन त्याना रेशन किट चे वाटप करन्यात आले आहे .
उल्हासनगर शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव अधिकच वाढत चालला आहे . या महामारीत डॉक्टर . नर्सेस .सफाई कर्मचारी . आशा वर्कर हे आपल्या कुटुंबाचा व आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र काम करुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत तेव्हा सौ . शालिनीताई ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली मनसे लालगड शाखा व समृध्दी फाऊंडेशन यांच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यानी या सर्व कोरोना योध्याचा सन्मान करुन त्याना रेशन किट चे वाटप केले आहे .
तर सदर कार्यक्रमास मा.सौ. उर्मिला तांबे मॅडम (प्रदेश सचिव) व संगीता चेंदवनकर (बदलापूर शहर अध्यक्षा . श्री. सचिन कदम (जिल्हा अध्यक्ष) श्री.बंडू देशमुख (शहर अध्यक्ष) उपस्थित होते.
दरम्यान सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास संदेश भागवत, नितेश चव्हाण, हर्षद बनसोडे, दीपक वाघमारे, मयुर दुधाने, सागर गायकवाड, तन्मय हजरा यांनी मोलाचे सहकार्य
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम