उल्हासनगर येथिल माजी नगरसेवक बच्चाराम रुपचंदानी यांचे कोरोनाने निधन .
- by Rameshwar Gawai
- Jul 01, 2020
- 1693 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव ऐवढा वाढला आहे की आता पर्यंत ४७ जणांचा या कोरोनाने बळी घेतला आहे . काल उल्हासनगर चे माजी नगरसेवक व नवजिवन कौ बॅंकेचे संचालक बच्चाराम रुपचंदानी यांचे कोरोना या आजाराने दु: खद निधन झाले आहे . तर त्यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे . तर महापालिकेच्या टॅक्स विभागातील एक अधिकारी परशुराम गायकवाड यांचे सुध्दा कोरोनाने निधन झाले आहे . त्यामुळे शहरातील एक एक चांगल्या व्यक्तींचा होत असलेला मृत्यु हा शहरवासीयाना धोक्याची घंटा आहे .
उल्हासनगर शहरात कोरोना बाधितांचा आकडा हा १९१४ वर पोहचला आहे . शहरातील रुग्णालये फुल होत चालली आहेत . त्यातच दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे . तर सस्पेक्टेड रुग्णाना खाजगी रुग्णालये उपचारा करिता दाखल करुन घेत नाहीत . दरम्यान उल्हासनगर येथिल व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आणि सहा वेळा नगरसेवक राहिलेले व नवजीवन बॅंकेचे संचालक . माजी नगरसेवक बच्चाराम रुपचंदानी वाशी येथिल रिलायंस हॉस्पिटल मध्ये कोरोनाशी लढा देत असताना त्यांचा मृत्यु झाला आहे . तर उल्हासनगर महापालिकेच्या टॅक्स विभागातील एक अधिकारी परशुराम गायकवाड यांचे सुध्दा कोरोनाने निधन झाले आहे तेव्हा शहरातील असे चांगले लोक कोरोनाचे बळी ठरत असल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे . दरम्यान महापालिकेने रुग्णाना बेड कमी पडु देवु नये अशी मांगणी नागरिक करत आहेत

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम