उल्हासनगर पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरावर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असुन हे सर्व अनलॉक मुळे होत आहे तर या अन लॉक मुळे बेफिकीर नागरिक रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसत आहेत . त्यातच फिजिकल डिस्टंसिंगचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे उल्हासनगर शहर हे एक हप्त्या करिता पुन्हा लॉक डाऊन करन्याची मांगणी मनसेचे शहर अध्यक्ष बंडु देशमुख . कॉंग्रेसचे सचिव रोहित साळवे आणि टिम ओमी कलानीचे अध्यक्ष ओमी कालानी यानी आयुक्ताकडे  केली आहे त्यामुळे उल्हासनगर शहर हे पुन्हा लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे . 

उल्हासनगर शहरात अनलॉक मुळे नागरिक असे वावरायला लागले आहेत की जसे काही कोरोना संपलेला आहे . रस्त्यावर नागरिक फिरत असताना फिजिकल डिस्टंसिंगचे ही भान नाही तर दुकाने सम विषम या पध्दतीने सुरु असताना काही दुकानदार सम विषम चे नियम ही पाळत नाहीत . तर दुकान बंद करन्याची दिलेली वेळ ही पाळत नसुन पोलिस येन्याची वाट दुकानदार बघतात . दरम्यान भाजी वाले फेरीवाले गल्ली बोळात फिरुन आपला धंदा करत असुन नियमाची पुर्णता पायमल्ली करत आहेत . याच अन लॉक मुळे उल्हासनगर शहरात कोरोना बाधितांचा आकडा १७५६ वर गेला आहे . नागरिकाना कोरोनाचे अजुन ही भय वाटत नसुन बिनधास्त पणे रस्त्यावर फिरत असताना दिसत आहेत . तेव्हा उल्हासनगर एक हप्त्या करिता पुर्ण पणे लॉक डाऊन करन्याची मांगणी मनसेचे शहर अध्यक्ष बंडु देशमुख . कॉंग्रेसचे सचिव रोहित साळवे आणि टिम ओमी कलानी चे प्रमुख ओमी कलानी यानी नवीन आयुक्त डॉ राजा दयानिधी याना निवेदन देवुन केली आहे . तर शहरात कोरोनाचा वाढता आकडा बघता रुग्णालये कमी पडणार असुन सहा ते सात लाख लोक संख्या असलेल्या शहरात कोरोना दिवसे दिवस वाढत आहे मात्र येथिल कोविड रुग्णालयात  व्हेंटिलेटर फक्त ९ आहेत . लोक संख्या किती आणि व्हेंटिलेटर किती ऐवढ्या व्हेंटिलेटर ने काय होणार प्रत्येक कोविड रुग्णालयात किमान पाच पाच तरी व्हेंटिलेटर असणे आवश्यक असताना फक्त ९ व्हेंटिलेटर ने काय होणार असा प्रश्न येथील सुज्ञ नागरिकाना पडला आहे. दरम्यान शहरात पुन्हा लॉकडाऊन होने गरजेचे आहे.तर ते ही अत्यंत कडक लॉकडाऊन असायला हवा आहे.

संबंधित पोस्ट