वाढीव-अनैतिक वीज बिलांना रद्द करण्यासाठी मुंबई वॉचडॉगच्या रवि नायर यांची मोहीम
- by Reporter
- Jun 30, 2020
- 862 views
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या सांगण्यानुसार लॉकडाऊनच्या काळात सर्व जनता घरी बसली, अनेकांचे रोजगार बुडाले, नोक-या गेल्या, कमी वेतन मिळाले, वयोवृद्धांचे हाल झाले, त्यानंतरही अदानी वीज कंपन्यांसारख्या कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे हिशोब दाखवून दणदणीत आणि कंबरडे मोडेल अशी विजेची बिलं पाठवायला सुरूवात केली. या कंपन्यांनी वीज बिल आकारणी करू नये, यासाठी मुंबई वॉचडॉग फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माध्यम सल्लागार यांनी जन चळवळ सुरू केली असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी आपल्या भावनांना वाचा फोडण्याचे काम केले असून याप्रकरणी तत्काळ उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्व वीज कंपन्यांच्या प्रमुखांना बोलावून याबाबत सूचना द्याव्यात आणि लॉकडाऊन काळातील विजेचे बिल माफ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुंबई वॉचडॉग फाऊंडेशनचे प्रमुख रवी नायर यांनी याबाबत ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर प्रसारित केली असून त्यातील मुद्यांचा याबाबत विचार व्हायला हवा. वीज कंपन्यांनी केवळ आणि केवळ नफा मिळविण्यासाठी दहा पट रकमा वाढवून बिलं पाठवली आहे. इंधन समायोजनसारख्या गोष्टी म्हणजे या कंपन्यांना सरकारने अधिकृतपणे लूटमार करण्यासाठी दिलेला परवानाच होय. कारण अतिरिक्त विज शिल्लक राहते म्हणून ग्राहकांकडून त्याची वसूली करण्याची पद्धती ही अनेकांना ठावूकच नसते. आपण कशासाठी पैसे भरतो तेही त्यांना ठावूक नसते. याबाबत तेरी भी चूप, मेरी भी चूप असे धोरण सत्ताधारी तसेच वीज कंपन्यांना अवलंबितात. नियामक मंडळाचे नाव पुढे करून दर कमी करता येत नाहीत, अशी उडवाउडवी करतात. पण नियामक मंडळाला दर कमी करण्याबाबत काही देणेघेणे नाही. वास्तविक या कंपन्या मनात आणले तर आकड्यांची जुळवाजुळव अशा प्रकारे करतात की, भल्या भल्यांना त्याचा उलगडा होत नाही व तीन आकडी रकमेचे बिल सहा पाच आकडी करून नंतर त्याची चार आकड्यांवर तडजोड करून ग्राहकांची लुटमार करतात, हे कळतदेखील नाही.
हे सारे अनैतिक प्रकार तत्काळ बंद झाले पाहिजे. या विज कंपन्यांच्या टगेगिरीला पायबंद घातला पाहिजे. धंदा करायचा आहे ना मग इमानदारीत करा, ग्राहक आपला मायबाप आहे, आपण त्याचे नोकर आहोत, ही मानसिकता त्यांच्या रुजविण्याची गरज आहे, असेही रवी नायर यांचे म्हणणे आहे.
याबाबतच्या मुंबई वॉचडॉग फाऊंडेशनच्या कार्यात स्वयंसेवकांचीही गरज असून इच्छुकांनी यात सहभागी होण्यासाठी ९९६९३३६१८८ वर व्हॉट्सअप किंवा एसएमएस पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रिपोर्टर