कोरोना समस्येबाबत आवश्यक सुचना देवुन केली चर्चा-ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या वतीने कोरोना काळात जनसंपर्क व सुसंवादाचा अभाव असल्याने लोकांच्या समस्या ऐकून त्यावर उपाय योजना करण्याबाबत मार्गदर्शनाचा अभाव आहे. त्यासाठी एक आपत्कालीन समिती नेमून प्रभागवार जबाबदार अधिकारी नेमावे,जे लोकांना दूरध्वनीवर उपलब्ध असतील व फक्त कोरोनाशी संबंधित तक्रारींचे निवारण करून योग्य ते मार्गदर्शन करतील.  अशा सुचना ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यानी महापालिकेचे आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मोहनाळकर यांना केल्या आहेत 

त्यानी सुचना देताना म्हटले आहे की  उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कोविड-१९  रूग्णालयांची यादी प्रसिद्ध करून त्यात रोजच्या रोज एकूण बेड उपलब्ध बेडीची क्षमता, आॅक्सीजनची सुविधा, व्हेन्टी लेटरची उपलब्धता, याची माहिती मोबाईल नंबर व काॅन्टॅक्ट पर्सनची माहिती जाहिर करावी.जेणेकरून गरजू रूग्णांना थेट संपर्क साधून प्रवेश घेता येईल.

आपत्कालीन समितीवर जबाबदार अधिकारी नेमावेत.या समितीत सर्व डॉक्टर असावेत   

या समितीतील अधिकारी व कर्मचा-यांनी येणा-या तक्रारी, शंकांचे निरसन करून मार्गदर्शन करावे,ही अपेक्षा आहे. जेणेकरून रूग्ण व त्याचा नातेवाईकांची ससेहोलपट व कुचंबणा थांबेल.

उल्हासनगर मधे कोविड रूग्णांप्रमाणे संशयित कोविड रूग्णांसाठीही महापालिकेच्या वतीने मोफत विलगीकरण कक्ष निर्माण करावेत. त्यासाठी टाउन हाॅल, तरण तलावाच्या इमारती ताब्यात घ्याव्यात. तसेच शहरातील समाज मंदिरं, हाॅलमधे सोय करता येईल.

उल्हासनगर मधे कोविड टेस्टसाठी दोन उपकरणं आणली आहेत त्याद्वारे पाच ते दहा मिनिटांत कोरोनाची टेस्ट होईल त्यासाठी ६००  रूपये चार्ज असून ते ही महापालिकेच्या वतीने भरले जातील,असे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहिर केले होते,ही उपकरणं कुठे उपलब्ध आहेत ?.ती अद्याप का उपलब्ध झालेली नाहीत? याची माहिती जाहिर करावी. 

डॉ . मोहनाळकर यानी  एक दिलासादायक माहिती यावेळी दिली आहे की  जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या मिटींग मधे उल्हासनगरच्या १०  हजार नागरिकांची मोफत चाचणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर मान्यता लेखी स्वरुपात प्राप्त झालेली नसली तरी टेऊंराम आश्रममधे सदर मोफत स्वॅब टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 उल्हासनगरच्या  गरजू रूग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत व खाजगी रुग्णवाहिका चालक मनमानी पद्धतीने दर आकारतात काल एका रूग्णास डाॅ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयापासून डाॅल्फिन कोविड सेंटरमधे अवघ्या एक कि.मी.अंतरासाठी ३०००  रूपये मोजावी लागले ही बाबही मी त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे .त्यावेळी त्यांनी गरजू रूग्णांना मोफत रूग्ण वाहिका उपलब्ध असल्याची माहिती देताच सदर रुग्णवाहिका चालकांचे संपर्क क्रमांक प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर करावेत,अशी मांगणी ही  त्यांना केली आहे. कोरोना हे अकल्पित संकट असल्याने त्याच्याशी संघर्ष करण्यासाठी शहरातील समाजसेवक, एन जी ओ .  पत्रकार आदींना विश्वासात घेऊन त्यांचे सहकार्य घ्यावे,अशी सूचना मालवणकर यानी यावेळी केल्या आहेत .

कोरोनाग्रस्तांच्या समस्येबाबत समाजसेवक शिवाजी रगडे या कोरोना योध्याला  उपोषण करण्याची पाळी का येते, त्यावर मार्ग काढण्यासाठी आयुक्तांनी  लक्ष घालावे अशी  विनंती ही करण्यात आली  आहे. 

एकंदरीत या संकटांवर मात करण्यासाठी लोकांचा विश्वास संपादन करणे व त्यांच्या संपर्कात राहून समस्यांचे निवारण करणे,ही प्राधान्याने गरज समजून शासन,प्रशासन व जनतेच्या समन्वयाने उल्हासनगर पुन्हा उल्हासित करण्याची गरज आहे ,अशी अपेक्षा ही दिलीप मालवणकर यानी  व्यक्त केली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट