उल्हासनगर शहरात कोरोना बाधितांचा वाढता आकडा बघता नवीन आयुक्त लागलेत कामाला .
- by Rameshwar Gawai
- Jun 27, 2020
- 1020 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात कोरोनाचा कहर सुरुच असुन रोज पॉझियिव्ह रुग्ण मिळुन येत आहेत.तर याच कोरोनावर मात करन्यासाठी शासनाने भारतीय प्रशासकिय सेवेतील डॉ राजा दयानिधी याना पाठवले असुन त्यानी अधिकारी यांच्या बैठका घेवुन शहरातुन कोरोना कसा हद्दपार होईल याची व्युव्हरचना आखणे सुरु केले आहे दरम्यान त्यानी शहरातील कोविड रुग्णालयांचा दौरा करुन माहीती घेतली आहे .
उल्हासनगर शहरात कोरोना ग्रस्तांचा आकडा १२०० च्या वर गेला आहे . तर या कोरोनावर मात करन्यासाठी महापालिका यंत्रणा अयशस्वी ठरलेली असल्याने शासनाने गोंदिया येथिल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजा दयानिधी याना आयुक्त म्हणुन पाठवले आहे . त्यानी पदभार स्विकारताच अधिकाऱ्यांच्या बैठका घेवुन कोरोना बाबत चा आढवा घेतला तर शहरातील कोविड रुग्णालयामध्ये जाऊन तेथील आढावा घे ऊन कोरोनावर कशा प्रकारे मात करायची या बाबत व्युव्हरचना आखण्याचे काम नवीन आयुक्त डॉ दयानिधी यानी सुरु केले आहे . शहरात महापालिकेने टेऊ राम आश्रम . शासकिय प्रसुती गृह . रेडक्रास सोसायटी . आय टी आय . राज्य कामगार विमा योजना रुग्णालय . या ठिकाणी कोविड रुग्णालये तयार केले असुन या रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार होतात . दरम्यान कोरोनामुळे इतर आजारावर कोणतेच उपचार होत नाहीत . तर खाजगी रुग्णालये देखिल इतर आजारांच्या रुग्णाना उपचारा करिता दाखल करुन घेत नाहीत . महापालिकेने २१ जुन रोजी एक आदेश काढुन खाजगी रुग्णालयाना आदेश देऊन इतर आजारांच्या रुग्णाना उपचारा करिता दाखल करन्याची नोटीस सुध्दा बजावली आहे . त्या नोटीसीत महापालिकेने म्हटले आहे की खाजगी रुग्णालयात कोणत्या ही आजाराचा रुग्ण उपचारा करिता आला तर त्याला दाखल करुन घ्या . तुम्हाला त्याचे स्वॅब घ्यायचे असतील तर ते घेवुन तपासणी करिता पाठवुन द्या . जर त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याला महापालिका उपचारा करिता घे ऊन जाणार . असा आदेश येथिल खाजगी रुग्णालयाना असताना सुध्दा महापालिकेचा हा आदेश खाजगी रुग्णालयानी केराच्या टोपलीत टाकुन दिला आहे . तर कोणत्या ही आजाराच्या रुग्णाना हे खाजगी रुग्णालये उपचारा करिता दाखल करुन घेत नाहीत . त्यामुळे शहरात मृताचा आकडा सुध्दा वाढत चालला आहे . दरम्यान सस्पेक्टेड रुग्णांना सुध्दा कोविड रुग्णालयात उपचार मिळाले पाहिजेत . सस्पेक्टेड रुग्ण आणि कोविड रुग्ण असे वर्गीकरण करुन त्यांच्यावर एकाच ठिकाणी उपचार करणे गरजेचे आहे कारण या सस्पेक्टेड रुग्णांचा चाचणी अहवाल येन्यास बराच विलंब होतो . त्यामुळे या सस्पेक्टेड रुग्णाना उपचारा करिता कोणते ही रुग्णालय घेन्यास तयार नसते त्यामुळेच चाचणी अहवाल येन्या पुर्वीच त्यांचा मृत्यु होतो असे मृत्यु गेल्या १५ दिवसा पासुन होत आहेत . या वर नवीन आयुक्त डॉ दयानिधी काय उपाय योजना आखतात त्यावर अवलंबुन आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम