
उल्हासनगरात वकीलाची गळफास घेवुन आत्महत्या
- by Rameshwar Gawai
- Jun 26, 2020
- 732 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर वकील बार असोशिएशन चे सदस्य ॲड उमेश भिमराव खंडागळे यानी काल रात्री राहत्या घरातच गळफास घेवुन आत्महत्या केल्याने उल्हासनगर न्यायालयात शोककळा पसरली असुन सर्व वकील वर्गात हळह्ळ व्यक्त होत आहे .
उल्हासनगर येथिल शहाड परिसरात ॲड उमेश भिमराव खंडागळे हे आपली पत्नि व एक लहान मुलगी यांच्या सह राहत असुन ते उल्हासनगर चोपडा न्यायालयात आपली वकीली करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. तर वकील बार असोशिएशन चे सदस्य सुध्दा होते . मात्र काल रात्री त्यानी आपल्या राहत्या घरीच लोखंडी ॲंगला रस्सीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे . परंतु हत्येचे कारण अद्याप समजले नाही . दरम्यान पोलिसानी त्यांच्या मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदना करिता मध्यवर्ती रुग्णालयात नेला असुन त्यांच्या अचानक जान्याने वकील वर्गात हळहळ व्यक्त होत आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम