आईशी अनैतिक संबध असल्याच्या रागातुन सावत्र बापाने केला मुलाचा खुन .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ४ येथे राहणाऱ्या एका सावत्र बापाने आई शी अनैतिक संबध असल्याच्या कारणा करुन मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे . या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात त्या सावत्र बापा विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे . 

उल्हासनगर कॅंप ४ येथे राजेश खरात व आई  आणि सावत्र वडील यांच्या सोबत राहत होता . तर राजेश चे त्याच्या आई सोबत अनैतिक संबध आहेत असा संशय सावत्र बाप विजय नाथा चव्हाण (४०) याना होता . तेव्हा त्यांचे याच कारणा वरुन भांडणे सुध्दा होत होती दरम्यान दि . २५ जुन रोजी रात्री राजेश हा आपल्या खोलीत झोपला असता त्याचे सावत्र वडील विजय चव्हाण याने राजेशच्या खोलीत जावुन त्याच्या डोक्यात लोखंडी ॲंगल ने जोरात प्रहार करुन त्याला जागीच जीवे ठार  मारले . तेव्हा राजेश चा भाऊ विशाल खरात याने सावत्र बाप विजय चव्हाण यांच्या  विरुध्द विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन पोलिसानी विजय चव्हाण विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असुन त्याला अद्याप अटक केली नाही . तर या गुंह्याचा तपास पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) एन जी खडकीकर हे करत आहेत .

संबंधित पोस्ट