विक्रेत्यांनी कोविडची टेस्ट करण्याचे वाडा नगरपंचायतचे आवाहन
- by Adarsh Maharashtra
- Jun 26, 2020
- 712 views
पालघर (जाऊन शेलार) : वाडा तालुक्यात सध्या कोविड रुग्णांची लक्षणीय वाढ झाली असून वाडा शहरातही रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वाडा नगरपंचायत हद्दीतील विक्रेत्यांनी कोविडची चाचणी करून घेण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून वाडा शहरातील सर्व किराणा दुकानदार , औषध विक्रते , भाजीवाले , मटण - चिकन - मासे विक्रेते , बँक कर्मचारी , मोबाईल दुकानदार , दुध विक्रेता , बेकरी व्यवसायिक , चप्पल विक्रेते व इतर सर्व व्यापारी यांनी कोविडची चाचणी खाजगी लॅब अथवा सरकारी लॅब (आयडियल कॉलेज हॉस्पिटल पोशेरी, ता.वाडा ) मध्ये करून घ्यावी, असे आवाहन वाडा नगरपंचायतकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात करण्यात आले शे.
तसेच स्वॅब देऊन आल्यावर डॉक्टरांच्या सुचनेनुसार घरी अथवा सुचवलेल्या संस्थेच्या ठिकाणी विलगीकरण राहणे अत्यंत आवश्यक असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही नगरपंचायत प्रशाससनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान वाडा शहरातील खाजगी दवाखान्यातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह येत असल्याने त्यांनी सुरक्षेची अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून पॉझिटिव्ह डॉक्टरांकडून उपचार घेणाऱ्या रुग्णांना शोधण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम