वाडा तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रासाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप
- by Reporter
- Jun 25, 2020
- 685 views
पालघर (प्रतिनिधी) : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यात २४ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांसाठी निवृत्त जिल्हाधिकारी बी. बी. ठाकरे यांच्यावतीने मास्क, सॅनिटायझर व रोगप्रतिकारक शक्ति वाढविणाऱ्या औषधाचे वाटप करण्यात आले. गुरुवारी (२५ जून) वाडा पंचायत समिती प्रशिक्षण हॉलमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हे साहित्य वाटपासाठी पंचायत समिती विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी निवृत्त जिल्हाधिकारी बी. बी. ठाकरे, पंचायत समिती सभापती योगेश गवा, सामाजिक कार्यकर्ते विलास आकरे, चंद्रकांत पष्टे, गोविंद पाटील, शिवाजी पाटील, विस्तार अधिकारी थालेकर, जाधव उपस्थित होते.
रिपोर्टर