उल्हासनगर मधील रुग्णालयाची दुरावस्था करुन खाजगी मालमत्ता ताब्यात घेवुन महापालिका बनवत आहेत कोविड रुग्णालये
- by Rameshwar Gawai
- Jun 24, 2020
- 321 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात तीन शासकिय रुग्णालये असुन या रुग्णालयाची फारच दुरावस्था झालेली आहे . कोरोना प्रादुर्भाव झाल्या पासुन महापालिकेने कॅंप ४ येथिल शासकिय प्रसुतीगृह आणि कामगार रुग्णालय हे कोविड रुग्णालय बनवुन तेथे कोविड रुग्णावर उपचार होत आहेत . तर मध्यवर्ती रुग्णालय हे नान कोविड असुन तेथे सर्व सामान्य रुग्ण उपचारा करिता जातात . तेव्हा शासनाने याच तीन ही रुग्णालयात सर्व सुविधा या पुर्वीच उपलब्ध करुन दिल्या असत्या तर महापालिकेला येथिल खाजगी मालमत्ता ताब्यात घेन्याचे वेळ आली नसती .
उल्हासनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेव्हा महापालिकेने प्रथम कॅंप ४ येथिल शासकिय प्रसुती गृह ताब्यात घेवुन तेथे कोविड रुग्णालय बनवले . तर रुग्णांचा वाढता आकडा बघता महापालिकेने कामगार रुग्णालय सुध्दा ताब्यात घेवुन ते ही कोविड रुग्णालय बनवले आहे . दरम्यान रुग्णांची संख्या दिवसे दिवस वाढत चाललेली हे लक्षात येताच कॅंप ३ येथील फालवर लाईन जवळ असलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका ही महापालिकेने ताब्यात घेवुन तेथे ही कोविड रुग्णालय तयार केले आहे . तरी ही रुग्णांचा वाढता आकडा पाहता महापालिकेने पुन्हा आय टी आय ची इमारत ताब्यात घेवुन त्या ठिकाणी ही कोविड रुग्णालय तयार केले आहे . तर ३०० बेड चे प्लॅटिनम नावाचे खाजगी रुग्णालय सुध्दा कोविड रुग्णाना लुटन्यासाठी तयार केले आहे . दरम्यान सध्या कॅंप न . ५ येथिल पुज्य चालिया मंदिरांचे दोन लग्न हॉल सुध्दा आता महापालिकेने त्याब्यात घेतले असुन त्या हॉल मध्ये ही कोविड रुग्णालय आणि क्वारंटाईन सेंटर बनवन्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरु झाला आहे . तर या पुर्वीच
टेऊराम आश्रम महापालिकेने ताब्यात घेतलेला असुन तेथे संशयीताचे स्वॅब घेन्याचे काम होत असुन सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णाना उपचारा करिता दाखल करन्यात येते . ऐवढेच नसुन रेड क्रास ची जागा ही ताब्यात घेवुन तेथे ही स्वॅब घेन्याचे सेंटर तयार करुन २३ बेड सुध्दा लावलेले आहेत . मात्र ऐवढे असताना ही शहरात तीन शासकिय रुग्णालये आहेत . मात्र या रुग्णालयात सुरवातीलाच चांगल्या अशा सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत . सेना भाजपाचे सरकार असताना सेनेचे असलेले आरोग्य मंत्री डॉ दिपक सावंत यानी दोन वेळा मध्यवर्ती रुग्णालय व कामगार रुग्णालय यांचा दौरा केला होता आणि त्यानी या दोन्ही रुग्णालयाना चांगल्या सुविधा देवुन डॉक्टर सुध्दा देन्याचे चांगले चॉकलेट दिले होते . परंतु या रुग्णालयाला शासना कडुन काहीच मिळाले नाही . सध्या तर पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यानी तर उल्हासनगर दत्तकच घेतले असुन त्यानी या शहराच मात्र काही ही भले केलेले दिसत नाही जर हेच तीन ही रुग्णालये या पुर्वीच सुसज्ज अशा सुविधानी तयार केले असते तर येथील नागरिकांवर मुंबईला उपचारा करिता जाण्याची वेळच आली नसती . तर या कोरोना महामारीच्या काळात ही खाजगी मालमत्ता ताब्यात घेन्याची वेळ महापालिकेवर आली नसती . परंतु हा शासनाचा अक्ष्म्य दुर्लक्षित पणा हाच शासनाला नडत चाललेला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम