राज्याकडूनही पतंजलीला दणका; कोरोनिल ला दिला खोकला-तापाच्या औषधाचा परवाना

डेहराडून  : कोरोनावर प्रभावी औषध कोरोनिल आणल्याचा दावा करणाऱ्या पतंजलीच्या समस्येत आता अधिक वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या नोटीसीनंतर आता उत्तराखंड  राज्याच्या आयुर्वेद विभागानेही पतंजलीला नोटीस बजावली आहे. कोरोना किटसाठी परवानगी मिळाली कशी? कोणत्या आधारावर हा दावा केला जातो आहे?, अशी विचारणा पतंजलीला राज्याच्या आयुर्वेद विभागाकडून करण्यात आली आहे.
राज्याच्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंजलीला इम्युनिटी बुस्टर, खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना देण्यात आला होता. त्यात कोरोनाव्हायरसचा उल्लेख नव्हता.
उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं, "पतंजलीने आमच्याकडे अर्ज दिला होता, त्यानुसार आम्ही त्यांना परवाना दिला. मात्र त्यांनी कोरोनाव्हायरसचा उल्लेख केला नव्हता. आम्ही इम्युनिटी बुस्टर, सर्दी-खोकला आणि तापाच्या औषधासाठी परवाना मंजूर केला होता. त्यांना कोरोना किट बनवण्यासाठी परवानगी कशी मिळाली, याबाबत आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे

संबंधित पोस्ट