उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे यांची एका महिन्यात उचलबांगडी . डॉ मंताडा राज दयानिधी यांची आयुक्त पदी नियुक्ती .
- by Rameshwar Gawai
- Jun 23, 2020
- 708 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी सुधाकर देशमुख हे असताना त्यानी कोरोना चा ससर्ग रोखन्या करिता चांगले प्रयत्न केले होते . तर शहरात रुग्ण वाढु नये या करिता ते कोशिश करत असतानाच त्यांची बदली करुन त्यांच्या जागी महापौर यांच्या मुलांच्या खास मर्जितील समीर उन्हाळे याना आणले. परंतु या उन्हाळे यानी कोणते ही काम केले नसल्याने शहरात कोरोना ग्रस्तांचा आकडा हा अकराशेच्या पार गेला आहे . तर प्लॅटिनम हॉस्पिटल चा सावळा गोंधळ करुन कोरोना रुग्णांना पाहिजे ते उपचार मिळाले नाहीत . याच कारणाने शासनाने त्यांची उचलबांगडी करुन त्यांच्या जागी भारतीय प्रशासकिय सेवेतील डॉ . मंताडा राज दयानिधी यांची आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे .
उल्हासनगर शहर हे एक उपेक्षित शहर आहे . या शहराला किती ही चांगला आयुक्त लाभला तरी येथिल राजकिय लोक त्या आयुक्ताला काम करु देत नाहीत त्यांच्या मर्जि प्रमाणे काम केले तर आयुक्त चांगला नाही तर त्या आयुक्ताच काही खर नाही असा रिवाज उल्हासनगर चा आहे . २०१७ मध्ये महापालिकेची निवडणुक झाली तेव्हा आयुक्त पदी राजेंद्र निंबाळकर हे होते . त्यांच्या कार्यकाळात शहरात विकास कामे होत होती . पण ते कोणत्या ही राजकारण्याचे व लोकप्रतिनिधीचे ऐकत नव्हते . तर त्यांचा स्वभाव थोडा वेगळा होता . त्यामुळे त्यांची बदली झाली . त्यांच्या जागी गणेश पाटील हे आयुक्त म्हणुन आले त्यानी पण चांगले काम केले पण त्यांची सुध्दा बदली करन्यात आली . तर त्यांच्या जागी धुळ्यावर सुधाकर देशमुख याना आणुन बसवले . दरम्यान देशमुख यांच्या कार्यकाळात कोरोना सुरु झाला सुरवातील एक ही रुग्ण नव्हता . परंतु नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला . तरी पण देशमुख यानी चांगले प्रयत्न केले . दरम्यान देशमुख हे नगरसेवक याना जरा ही मदत करत नव्हते . त्यामुळे महापौर लिलाबाई आशान यांचे पुत्र व नगरसेवक अरुण आशान यांच्या खास मर्जीतील समीर उन्हाळे याना आयुक्त पदावर आणुन देशमुख यांची बदली करन्यात आली . उन्हाळे हे येताच त्यानी कोरोना चा प्रादुर्भाव कसा रोखल्या जाईल या बाबत कोणतेच असे भरीव काम केले नाही . त्यामुळे शहरात कोरोना ग्रस्ताचा आकडा ११५६ वर गेला आहे . तर वादग्रस्त सत्य साई प्लॅटिनम कोविड हॉस्पिटल महापालिकेच्या निधीतुन उभे करुन पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाने त्या हॉस्पिटलला मदत केली . अशा या वादग्रस्त निर्णया मुळे उन्हाळे यांची बदली करन्यात आली अशी चर्चा सुरु आहे . तर त्यांच्या जागी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंताडा राज दयानिधी ( आय ए एस ) यांची नियुक्ती केली आहे . दरम्यान दयानिधी याना भारतीय प्रशासकिय सेवेतील अनुभव असल्याने ते आता कोरोनावर कशा प्रकारे मात करतील हे लगेच दिसुन येइल . तर नव्या आयुक्तानी सत्ताधाऱ्यांच्या ताटा खालचे मांजर बनु नये अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे . पाच वर्षात चार आयुक्त व तीन महापौर शहराला लाभले . परंतु शहराचा कोणता ही विकास झाला नाही .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम