उल्हासनगर महापालिकेच्या दुर्लक्षपणा मुळे वाढत आहेत कोरोना रुग्ण-आयुक्त निष्फळ
- by Rameshwar Gawai
- Jun 22, 2020
- 381 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांचा वाढता ग्राफ बघता याला सत्ताधारी व महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे दिसुन येते शहरात एक हजार ५६ रुग्ण हे एक या सत्ताधारी व महापालिका प्रशासन याना एक प्रकारे आव्हानच आहे . या सत्ताधाऱ्यानी सुरवात पासुनच दुर्लक्ष केल्याने रुग्ण संख्या वाढत चालली आहे . तर नव्यानेच आलेले आयुक्त समिर उन्हाळे हे एकदम निष्फळ ठरले असुन त्यानी कोरोना प्रादुर्भाव रोखन्यास कोणते ही उपाय योजना केली नसल्याने उल्हासनगर शहर कोरोनाच्या बारुदवर उभे आहे .
उल्हासनगर शहरात दोन महिन्या पुर्वी एक ही कोरोनाचा रुग्ण नव्हता . परंतु नंतर एक एक रुग्ण मिळत गेले आणि या रुग्णांची साखळी तयार होवुन शहरातील काही नगरे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले . तर या हॉटस्पॉट मधुन नागरिकांची क्वारंटाईन करन्यास लाईन लागली . आणि हीच लाईन एक एक पॉझिटिव्ह येत चालली आहे . मात्र महापालिका प्रशासन व सत्ताधारी यानी कोरोनाच्या नावाने पुर्णता राजकारण सुरु केले आहे . खाजगी रुग्णालये याना महापालिका पाठिशी घालत आहे . तर कोविड च्या नावाने शासनाच्या निधीवर सत्ताधारी हे डल्ला मारन्याच्या तयारीत आहेत . भिवंडी बायपास येथिल टाटा आमंत्रा मध्ये ज्याना क्वारंटाईन म्हणुन ठेवन्यात येते त्यांच्या जेवनाचा नास्त्याचा चहा पाण्याचा साबण सॅनिटायझरिंग यांचा दिवसाला किती खर्च येतो याचा तपशिल अद्याप ही महापालिकेने नागरिका समोर उघड केला नाही . तर तेथे जेवनाचे कंत्राट कोणाला दिले . प्रत्येक प्लेटीचा खर्च किती आहे हे सुध्दा महापालिकेने जाहिर केले नसुन शासनाचा किती निधी या करिता मिळाला आहे हे सुध्दा या सत्ताधाऱ्यानी जाहीर केलेले नाही . त्यातच शहरात शासकिय प्रसुती गृह आणि कामगार विमा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणुन महापालिकेने ताब्यात घेवुन तेथे कोरोना बाधित रुग्णाना उपचारा करिता ठेवन्यात येते तर रुग्ण संख्या वाढत असल्याने महापालिकेने टेऊराम आश्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आणि आय टी आय यांचा ही महापालिकेने ताबा घेवुन त्या ठिकाणी सुध्दा कोरोना बाधित रुग्णाना ठेवण्यात येते . दरम्यान रेडक्रास सोसायटी चे रुग्णालय सुध्दा अति लक्षणे असणाऱ्या रुग्णाना उपचारा करिता दाखल करन्या साठी महापालिकेने ताब्यात घेतले आहे . परंतु या सर्व कोविड रुग्णालयात जेवण कोण कंत्राटदार पुरवतो व कोणत्या दराने जेवण देतो याचा खुलासा महापालिका व सत्ताधारी यानी अद्याप पर्यंत केलेला नाही . कारण या सत्ताधाऱ्यानी कोरोनाच्या नावाने आपला धंदा सुरु केला असुन कोरोनाने मृत झालेल्या च्या टाळु वरील लोणी खाण्याचे काम हे सत्ताधारी करत आहेत . सुधारकर देखमुख आयुक्त असताना या सत्ताधऱ्यांची अजिबात डाळ शिजत नव्हती तेव्हा देशमुख याची बदली करुन निस्क्रिय समिर उन्हाळे याना आयुक्त पदावर आणुन या सत्ताधाऱ्यानी आपला धंदा जोरात सुरु केला आहे . त्यामुळे शहरात जेवढे जास्त कोरोनाचे रुग्ण मिळतील तेवढा यांचा धंदा तेजीत होणार आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम