
दिव्यांग संस्थेला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून काँग्रेसने दिली राहुल गांधी यांच्या वाढदिवसाची गिफ्ट, माय-लेकाचा पुढाकार.
- by Rameshwar Gawai
- Jun 22, 2020
- 996 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) :
या घडीला कोविडच्या काळात एका परिपक्व राजकीय नेत्याची भूमिका निभावणारे
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त
उल्हासनगरातील काँग्रेस मधील मायलेकाने दिव्यांग आधार संस्थेला जीवनावश्यक
वस्तूंची मदत देऊन गांधी यांच्या वाढदिवसाची अनोखी गिफ्ट दिली आहे.
नेहमी
सामाजिक सोबतच विविध उपक्रम राबवणाऱ्या व काँग्रेसला सक्रिय ठेवणाऱ्या या
मायलेकाचे नाव अंजली साळवे व रोहित साळवे आहे. अंजली साळवे ह्या
काँग्रेसच्या नगरसेविका-गटनेत्या असून रोहित साळवे हे सरचिटणीस आहेत.
कोरोना
संक्रमणाने सर्वत्र चिंतेचे वातावरण असून त्यात तीन महिन्यापासूनच्या लॉक
डाऊनमुळे गोरगरीब, दिव्यांग यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे.अशातच
अंजली साळवे-रोहित साळवे यांनी दिव्यांग आधार सेवा संस्थाच्या २५
सदस्यांना महिनाभर पुरणार अशा जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात दिला
आहे.सरचिटणीस रोहित साळवे, साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके ,अंबरनाथ युवक
काँग्रेस अध्यक्ष मनोज ठाकूर , ब्लॉक उपाध्यक्ष शैलेंद्र रुपेकर यांच्या
हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
राहुल
गांधी यांच्या वाढदिवसाची जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आल्याने
दिव्यांग आधार संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत आणि वाघचौरे यांनी अंजली साळवे
रोहित साळवे यांना त्यांच्या या मदतीसाठी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित
केले आहे .लॉक डाऊनच्या काळापासून नगरसेविका अंजली साळवे व महासचिव रोहित
साळवे यांच्या वतीने अद्यापपर्यंत प्रभाग क्रमांक १८ मधील १५०० गरजू
कुटुंबाना राशन सामग्री पुरवण्यात आली आहे , या व्यतिरिक्त २०० रिक्षा चालक
,१०० नाका कामगार , घर कामगार , सफाई कामगार , आशा वर्कर व तसेच आज २५
दिव्यांग व अपंग परिवारास सर्व मिळून सुमारे २००० च्या वर कुटुंबियांना
मदतीचा हात दिला आहे.कारवा युंही चलता रहे गा अशी बोलकी प्रतिक्रिया रोहित
साळवे यांनी व्यक्त केली.लॉक डाऊनमध्ये काँग्रेसचे ऑफिस बंद ठेवण्यात आलेले
नसून सुरूच असल्याची माहिती देखील रोहित साळवे यांनी दिली.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम