उल्हासनगर मधील साई प्लॅटिनम हॉस्पिटल कडुन कोविड रुग्णांची लयलुट

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या निधीतुन ५१ लाख रुपये खर्च करुन येथिल रिजंसी प्लाझा या ठिकाणी कोविड च्या रुग्णांवर मोफत उपचार करन्या साठी अद्यावत रुग्णालय उभारण्यात आले आहे . मात्र या रुग्णालया बाहेर साई प्लॅटिनम ने आपले दर पत्रक लावुन रुग्णांकडुन अनामत रक्कम म्हणुन २० हजार रुपये घेन्यास सुरवात केली . 

उल्हासनगर शहरात सध्या सहा शासकिय कोविड रुग्णालय तयार केले असुन पैशावाल्या करिता सेंट्रल पार्क हॉटेल  या ठिकाणी कोविड चा उपचार होतो . तर भिवंडी बायपास येथे टाटा ने बांधलेल्या इमारती मध्ये ४५० जणाना क्वारंटाईन करन्या करिता राहन्याची व्यवस्था केली आहे . दरम्यान महापालिकेने कॅंप ३ येथिल रिजंसी प्लाझा या ठिकाणी  ५१ लाख रुपये खर्च करुन   ३०० बेडचे अद्यावत रुग्णालय तयार केले आहे . या रुग्णालयाचे उध्दाटन देखिल पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले . दरम्यान मंत्री महोदय यानी हे रुग्णालयात  गोर गरीब व सर्वच नागरिका करिता कोविड वर उपचार मोफत होणार आहेत असे  सांगितले होते . तर रुग्णांच्या उपचाराचे बिल हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य दायी योजनेतुन रुग्णालयाला मिळाणार असे ही सांगितले होते . मात्र साई प्लॅटिनम व महापालिका  या दोघांच्यात कोणताही समनवय नसल्याने प्लॅटिनम वाल्यानी २० हजार अनामत रक्कम जो पर्यंत भरली जात नाही तो पर्यंत कोविड च्या रुग्णाला उपचारा करिता दाखल करन्यात येणार नसल्याचे असे पत्रक लावुन एक दर पत्रक सुध्दा बाहेर लावले आहे  . दरम्यान महापालिकेचे आरोग्य अधिकारी सुहास मोहनाळकर यानी सांगितले की हे रुग्णालय महापालिकेने ५१ लाख रुपये खर्चुन उभे केले आहे . तर या रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत . मग साई प्लॅटिनम ने बाहेर दर पत्रक का लावले आहे . सत्ताधारी व साई प्लॅटिनम हे दोन मिळुन हे रुग्णालय चालवुन आपले खिसे भरणार आहेत का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत महापालिकेने हे रुग्णालय उभे करन्या करिता ५१ लाख रुपयाचा निधी दिला आहे . परंतु या रुग्णालयाच्या नामफलकावर महापालिकेचे नाव न टाकता सत्य साई प्लॅटिनम कोविड रुग्णालय असा फलक त्या रुग्णालय प्रशासनाने लावला आहे . त्यामुळे हे रुग्णालय महापालिकेचे नसुन यात सत्ताधारी हे भागीदार असल्याचे दिसुन येते . सत्य साई प्लॅटिनम यांचे एक खाजगी रुग्णालय सुध्दा उल्हासनगर शहरात असुन हे रुग्णालय नेहमीच वादात असते .

संबंधित पोस्ट