ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे आधार स्तंभ सुभाष भोसले यांचे अकस्मात निधन.

उल्हासनगर  / प्रतिनिधी : उल्हासनगर येथील ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे आधारस्तंभ सुभाष शंकर  भोसले यांचे   दि.२० एप्रिल रोजी सायंकाळी मॅक्सी लाईफ  हाॅस्पिटल, शांतीनगर ,उल्हासनगर-३  येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले आहे .

ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सुभाष भोसले हे गेली कित्येक वर्षे पत्रकारितेत कार्यरत होते. तसेच त्यांनी कित्येक नागरी समस्या आणि भ्रष्टाचार विरोधात आपल्या दैनिकांतून आवाज उठवून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.

दैनिक संध्याकाळ, दैनिक जनशक्ती, मुंबई मित्र, लोकमंथन अशा अनेक दैनिकांत  सुभाष भोसले यांनी पत्रकार म्हणून काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. 

त्याच प्रमाणे ज्येष्ठ पत्रकार सुभाष भोसले हे भीम आर्मी या संघटनेत  ठाणे जिल्हा स्तरावर  सक्रिय  होते. पत्रकार भोसले यांनी लॉक डाऊन काळात कित्येक गरीब व गरजू लोकांना विविध स्वरूपात मदत केली होती.ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सुभाष भोसले

यांच्या निधनाने उल्हासनगर शहराने एक झुंजार पत्रकार  गमावला आहे,शहरातील तमाम पत्रकार भोसले कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो, अशा शब्दांत  दिलीप   मालवणकर यांनी  श्रद्धांजली वाहिली आहे.

तसेच अन्याय विरोधी संघर्ष समिती हे  ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष कै. सुभाष भोसले यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीलच,  ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी  ज्येष्ठ पत्रकार सुभाष भोसले यांच्या सामाजिक कार्यकर्ता, रूग्ण मित्र, पत्रकार व लाॅकडाऊन काळात कोरोना योद्धा म्हणून केलेल्या कार्याची दखल घेऊन भोसले कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट