पालकमंत्र्याच्या हस्ते कोविंड रुग्णालयाचे उद्घघाटन
आँक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले, ३००खाटांचे प्रशस्त रुग्णालय नागरीकांच्या सेवेत.
- by Rameshwar Gawai
- Jun 19, 2020
- 828 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : शहरातील कोरोना बाधित रुग्णांना त्वरीत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी.म्हणून सर्व सुविधायुक्त असे ३००खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आले आहे.नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सत्य साई प्लँटिनम या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. दहा दिवसांत तयार करण्यात आलेल्या या रुग्णालयाची खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहाणी केली होती.यावेळी महापालिका आयुक्त समिर उन्हाळे, महापौर लिलाबाई आशान, शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, टिम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी आणि सर्व पक्षिय नगरसेवक उपस्थित होते.
उल्हासनगर शहरात दिवसा गणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे . आज ९००च्या वर पोहचली आहे.त्यामुळे महापालिका प्रशासनाने निर्माण केलेली आरोग्य व्यस्था,हाँस्पिटल आणि लँब्स कमी पडू लागल्या.अश्या अपु-या अवस्थेत रुग्णांवर उपचार कसा करावा.या विवंचनेत असतांना, नगरविकास मंत्र्यांनी ठाणे, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनर शहरात अद्यावत सुविधा युक्त कोविंड हाँस्पिटल तयार करुन, सामान्य रुग्णांसाठी उपयोगात अणायचे असा विचार केला.त्या प्रमाणे ठाणे,बदलापुर, अंबरनाथ येथे कोविंड हाँस्पिटल तयार करण्यात आले.मात्र उल्हासनगर बाकी होते.कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्य साई प्लँटिनम हाँस्पिटलचे डाँ.पाल आणि त्यांच्या संस्था सदस्याशी संवाद साधत सदरचे रुग्णालय कोविंड रुग्णां साठी उपलब्ध करण्याची मागणी केली.ती मान्य होताच, अगदी १० दिवसांत या हाँस्पिटल मध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी लागणा-या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. उद्घाटना पुर्वी खासदार डाँ. श्रीकांत शिंदे यांनी हाँस्पिटलची पहाणी केली होती.
काल सांयकाळी साई प्लँटिनम हाँँस्पिटलचे उद्घाटन नगरविकास व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे,खा.श्रीकांत शिंदे ,महापौर लिलाबाई आशान , विरोधीपक्ष नेते राजेंद्र चौधरी, धंनजय बोडारे, आयुक्त समिर उन्हाळे, टिम ओमी कलानीचे प्रमुख ओमी सुरेश कलानी, सर्व पक्षिय नगरसेवक यांच्या उपस्थितित करण्यात आले.
या रुग्णालयात २००बेड आँक्सीजनचे आहेत.३० बेड व्हेंटिलेटर ,कोरोना बाधित डायलिसिस साठी ६ बेड राखिव आहेत.तर बाकी चे बेड विलगिकरणासाठी असून येथे आँपरेशन थेटर देखिल उपलब्ध आहे.
यावेळी नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शहरातील कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळावा म्हणून या हाँस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे.तसेच हे रुग्णालय महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अख्त्यारीत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.त्यामुळे सामान्य रुग्णांना दिलासा मिळेल. तसेच महापालिकेच्या इतर रुग्णालयां मध्ये दाखल असलेल्या रुग्णांची काळजी घ्या, त्यांना सकस आणि पुरेसा आहार द्या.या लढाईत सरकार तुमच्या सोबत आहे.निधीची कमतरता भासू देणार नाही.अशी ग्वाही दिली.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम